66 Fake EVMs Seized from BJP Leader House ? 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर देशात नवे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, सध्या ईव्हीएमशी जोडणारी बातम्यांची कात्रणे व्हायरल करण्यात येत आहेत. भाजप नेत्याच्या घरातून ६६ बनावट ईव्हीएम सापडल्याचा दावा करणारे एक कात्रण सध्या व्हायरल केले जात आहे.
फॅक्ट चेक नकली ईवीएम जब्त चे कात्रण व्हायरल करून काही जण भाजपवर टीका करत आहेत. मात्र, याबाबत अधिक माहिती घेतली असता हे कात्रण दिशाभूल करणारे असल्याचे समोर आले. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीची बातमी व्हायरल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडला होता. पोलिसांनी हाऊसिंग बोर्डाच्या एका घरावर छापा टाकला आणि तेथे ठेवलेले ६६ डमी ईव्हीएम व प्रचार साहित्य जप्त केले होते. पोलिसांनी ईव्हीएम जप्त केल्याचे अहवालात समोर आले होते; परंतु नंतर ते डमी ईव्हीएम असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजप उमेदवाराच्या घरातून ईव्हीएम जप्त करण्यात आल्याचा दावा खोटा आहे.
हेही वाचा :
Leave a Reply