प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विरूद्ध विरोधी पक्षनेता राहूल गांधी | PM Narendra Modi Vs Rahul Gandhi

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विरूद्ध विरोधी पक्षनेता राहूल गांधी | PM Narendra Modi Vs Rahul Gandhi

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विरूद्ध विरोधी पक्षनेता राहूल गांधी | PM Narendra Modi Vs Rahul Gandhi

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विरूद्ध विरोधी पक्षनेता राहूल गांधी !

देशात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. भाजपाला 240 जागा मिळाल्या तर इंडिया आघाडीला 232 जागा मिळाल्या आहेत. चंद्राबाबू यांच्या टीडीपी आणि नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाचे पाठिंब्याने देशाचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली तर विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड झाली आहे.

विरोधी पक्ष नेता काय असतो. PM Narendra Modi Vs Rahul Gandhi

संसदेच्या परंपरेनुसार शपथविधीचा सोहळा पार पडला आहे. राष्ट्रपतींचे अभीभाषण झाले त्या अभिभाषणावर संसदेच्या विरोधी पक्षासह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे देखील भाषणे झालीत. या देशाच्या संसदेची गरिमा आणि परंपरा अशी आहे की विरोधी पक्षनेत्याचा आवाज हा देशातील पन्नास टक्के नगारीकांचा आवाज असतो.

विरोधी पक्षनेत्याच्या अपेक्षांचे प्रतिबिंब काय ?

याशिवाय विरोधी पक्ष नेत्याचे माध्यमातून संपूर्ण देशाच्या समस्यांचे-प्रश्नांचे -अपेक्षांचे विश्लेषण हे संसदेत मांडले जाते. म्हणून देशातील जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब हे विरोधी पक्षनेत्याच्या माध्यमातून उमटत असते, प्रतिबिबिंत होत असते. म्हणून विरोधी पक्षनेता काय बोलतो याकडे सरकारचे बारकाईने लक्ष असायला हवे. परंतू 2014 नंतर ही परंपरा संपली आहे.

आता विरोधी पक्षनेता संसदेत असूच नये किंवा विरोधी पक्षनेता असला तर त्याने संसदेत बोलूच नये किंवा बोलायला लागला तर त्याला बोलू देऊ नये, त्याचा स्पिकर बंद केला जातो, सत्ताधारी खासदार मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालतात. अर्थात यावर नियंत्रणासाठी लोकसभेचे अध्यक्ष हे महत्वपूर्ण मानले जातात. त्यांनी सर्व सभागृहाला नियंत्रीत करत देशाचे विरोधी पक्षाचे म्हणणे गांभिर्याने घेण्याची आवश्यकता असते.

म्हणून या देशाच्या घटनेत देशाचे राष्ट्रपती, देशातील राज्यपाल, लोकसभेचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचे नेमलेले असले तरी ते ‘निष्पक्ष’ असायला हवेत अशी घटनेला अपेक्षा आहे. परंतू या संदर्भात देखील आता तशा प्रकारचे चित्र दिसत नाही. राष्ट्रपतीच्या अभिभाषणात आणिबाणीचा उल्लेख करण्याची तशी अपेक्षा नव्हती, गरजही नव्हती. परंतू मागील दहा वर्षापासून देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्याची ‘फॅशन’ निर्माण झाली आहे.

आज देशातील नागरीक, देशातील तरूण, देशाच्या निम्मे लोकसंख्या असलेल्या महिला या जागृत झाल्या आहेत, आपल्या प्रश्नांप्रती सजग झाले आहेत. त्यामुळे त्यांना सत्तेवर असलेल्या प्रमुख व्यक्तींकडून लोकहिताच्या योजनांवर भाषण अपेक्षीत आहे. ‘मन की बात मधून’ जनतेच्या मनातील प्रश्न अपेक्षित आहेत.

भारतीय जनता पक्षाला देशातील जनतनेे 2014 आणि 2019 मध्ये सलग दोनदा बहुमताने सत्ता हवाली केली. 302 खासदार एकट्या भाजपाचे निवडून दिले. याचा अर्थ काय ? मग या 302 चे 2024 च्या निवडणूकीत 240 का झाले ? यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि या चिंतनात भाजपाला आपला अंहकार दिसत नसेल, विरोधी पक्षनेत्याची अवहेलना दिसत नसेल, येणार्‍या 2029 च्या निवडणूकीत एकट्या काँग्रेस पक्षाचे 300 खासदार असतील यावर संपूर्ण भाजपाईने चिंतन करण्याची आवश्यकता आहे.

या देशाच्या संसदेत विरोधी पक्षनेत्याच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढायचा आणि त्याच्या प्रतिमेला देशभर ‘जोडेमार’ आंदोलन करायचे हे सत्ताधारी पक्षाला शोभनीय तर नाहीच परंतू या विरोधात विरोधी पक्षाने पंतप्रधानांच्या एखाद्या वक्तव्या विरोधात चूकीच्या पद्धतीने आंदोलन केले तर तो लोकशाहीचा अपमान आहे.

देशाचे प्रधानमंत्री, देशाचे विरोधी पक्षनेता किमान यांच्या संदर्भात नागीकांनी सुद्धा काही पथ्ये पाळली पाहिजेत. निषेधाचे आंदोलन हे केवळ ‘जोडेमारूनच’ व्हायला हवे का ? जोडे मारणार्‍यांनी सुद्धा विचार करायला हवा. विशेष म्हणजे आंदोलनाचे ‘स्वरूप’ काय असावे यावर विचार करून पक्षश्रेष्ठींनी आदेश द्यायला हवेत. उरला प्रश्न ‘हिंदुत्व’ की ‘सर्वधार्म समभाव’ तर इतिहास साक्षी आहे या देशावर ज्या-ज्या लोकांनी केवळ जाती व्यवस्थेविरोधात आक्रमणे केली ती सर्व संपली म्हणून ‘हिंदूत्व’ हा मुद्दा निवडणूकीचा भाग होऊ शकतो,

परंतू सर्वधर्मीयांचा या विशाल देशात द्वेष करून राजव्यवस्था चालविता येणार नाही. संसदेतील प्रधानमंत्र्यांचे भाषणसुद्धा द्वेषमुलक नसावे, तर ते विकासाच्या आणि देशाच्या प्रगतीच्या दिशेेन वाटचाल करणारे असावे. देशातील हजारो शेतकरी आजही आत्महत्या करीत आहेत. लाखो-करोडो तरूण रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत.

महिला असुरक्षित आहेत, या देशाच्या मुलींना चोरणारे रॅकेट सक्रीय आहे. देशाच्या मुली आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या जात आहेत, भ्रूणहत्येचे प्रमाण कमी होत नसून वाढते आहे. लहान व्यापार्‍यांचे प्रश्न आहेत, जीएसटी आजही सूरळीत नाही. देशातील आरोग्याचा प्रश्न आजही गंभीर आहे. गावे ओसाड पडत आहेत. आणि महानगरांना आवश्यकतेपेक्षा जास्त ‘सूज’ आलेली आहे.

पर्यावणरणाचा प्रश्न गंभीर बनता आहे. वृक्षारोपण मोहिम ‘फोटोसेशन’ आणि बातम्यापुरती मर्यादीत झालेली आहे. महानगरांमध्ये श्वास घेणे कठीण झाले आहे. समाज-समाजात संवाद वाढण्याऐवजी ‘जातीयवाद’ वाढतो आहे. शेतकरी एमएसपीची वाट बघतो आहे. महागाईचा आलेख सातत्याने वाढतो आहे. आर्थिक विषमता वाढते आहे. रूपयाचे ‘अवमूल्यन’ सातत्याने होते आहे. आंतरराष्ट्रीय सीमा ‘धगधगत’ आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापारात भारत कमी पडतो आहे. असे अनेक प्रश्न देशासमारे असतांना केवळ विरोधी पक्षाचा द्वेष हा भाजपाला परवडणार नाही. त्यापेक्षा विकासाच्या प्रश्नावर ‘फोकस’ केला तर देशात ‘समृद्धी’ निर्माण होईल. म्हणून प्रधानमंत्री विरूद्ध राहुल गांधी असे चित्र निर्माण करणे भाजपाला परवडणारे नाही.

देशाच्या हिताचे ठरणार नाही. म्हणून प्रधानमंत्री विरूद्ध विरोधी पक्षनेता असे चित्र न दिसता विरोधी पक्षाचा आवाज सत्ताधारी पक्ष ऐकतो आहे आणि देशाचे प्रश्न सोडविण्याला प्रधान्य देतो आहे असे चित्र निर्माण होण्याची आवश्यकता आहे. तूर्तास एव्हढेच..

Important Links : 

Related Notification Information Pdf : Click Here
Official Website Information Link :  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !