Setu Kendra V Stamp Vendor : सेतु केंद्र व स्टॅम्प वेंडर यांच्याकडून होणारी लूट थांबवा अखिल भारतीय मानवाधिकार संघाची तहसीलदारांकडे मागणी.
पिंपळनेर – येथील ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र ,सेतू केंद्र, आधार केंद्र हे विविध दाखले प्रमाणपत्रांसाठी शासकीय दरापेक्षा जादा दर आकारून ग्राहकांची सर्रास लूट करीत आहेत.अशा केंद्रावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा.
तसेच शासन व मे.उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र ,राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, मिळविण्यासाठी अॅफिडेव्हिट तसेच शासकीय कार्यालय व न्यायालय यांच्यासमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्र ( शपथ पत्र) वर मुद्रांक शुल्क महाराष्ट्र शासनाने दि. 1 जुलै 2004 पासून माफ केलेले आहे,
अर्थात या दिनांका पासून शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर लागणार नाहीत.असे असताना या नियमांची जनतेला माहीत नसल्यामुळे मुद्रांक विक्रेते त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन वरील कारणांसाठी स्टॅम्प पेपर लिहून शासन आदेशाचा व मेहरबान न्यायालयाचा अवमान करीत आहेत.
तसेच स्टॅम्प पेपर विक्रेते शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरचे ग्राहकांकडून 120 ते 150 रुपये घेऊन फसवणूक करीत आहेत. तरी कृपया आपल्या कार्यक्षेत्रातील स्टॅम्प पेपर विक्रेतांना वरील प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्रासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा वापर करू नये असा सक्त आदेश द्यावा.
तसेच जादा दराने स्टॅम्प पेपर विक्री करणाऱ्या स्टॅम्प विक्रेतांचा परवाना रद्द करण्यात यावा. अशी मागणी अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर यांच्याकडून लेखी निवेदनाद्वारे मा. श्री. शेजुळ साहेब अप्पर तहसीलदार पिंपळनेर व मा. श्री. शिंपी साहेब नायब तहसीलदार साक्री यांच्याकडे करण्यात आली. याप्रसंगी अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे अध्यक्ष श्री. प्रविण थोरात ,श्री. दिनेश भालेराव, श्री. मुकुंद खैरनार श्री. पराग महाजन.श्री. प्रविण शिंदे हे उपस्थित होते.
हेही वाचा :
Leave a Reply