बोफखेल ग्रामपंचायतीचा ठेका घेणे भोवले पाच ग्रामपंचात सदस्य अपात्र.
पिंपळनेर । बोफखेल ग्रामपंचयत च्या पाच सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कामाचा ठेका घेऊन त्याची रक्कम आपल्या खात्यात वर्ग केले होती.
यावर आक्षेप घेत जितेंद्रकुमार भिवा कुवर याने मा. मे अप्पर जिल्हाधिकारी धुळे यांच्या कोर्टात श्रीमती जमनाबाई मगन कुवर, संजय बाबा वळवी, रामचंद्र नथु कुवर, दीपक सुक्राम पवार, विलास माल्या वळवी, या ग्रामपंचयत सदस्य विरुध्द प्रत्येक्ष हितसंबंध असल्याचे पुराव्यानिशी दर्शवून सदर सदस्यांच्या नावे धनादेश कडून रक्कम स्वतः च्या खात्यात वर्ग झाल्याचे पुरावे सादर केले व सदर सदस्यांना अपात्र घोषित करावे असा अर्ज केला.
त्यावर मा. अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली व कागदपत्रांची पडताळणी केली असता सदर ग्रामपंचयत सदस्यांनी स्वतःच्या नावे ठेके घेऊन ग्रामपंचयत अधिनियमाच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत ग्रामपंचयत अधिनियम १९५९ च्या कलम १४ (ग) नुसार मा जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र घोषित करत त्यांचे ग्रामपंचयत सदस्यत्व रद्द केले आहे व सदर आदेश माननीय तहसीलदार साक्री यांच्या मार्फत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Leave a Reply