टेम्पोच्या मागील चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शेवगावातील तळणी रस्त्यावरील रिद्धी सिद्धी जिनिंग मधील शेड मध्ये झोपलेल्या दोन बालकांचा टेम्पोच्या मागील.
{ अविनाश देशमुख शेवगांव }
शेवगाव रस्त्यावरील रिद्धी सिद्धी जिनिंग मधील शेड मध्ये झोपलेल्या दोन बालकांचा टेम्पोच्या मागील चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान घडली आहे .
यां सचिन लालसिंग मेवाड (वय 3 वर्षे), कार्तिक लालसिंग मेवाड (वय 2 वर्षे, दोघे रा. ताराबापडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोण, मध्यप्रदेश) असे दोन मुले साखर झोपेत असतांना जागेवर मृत झाली . सकाळच्या निरव शांततेत झालेल्या मुलांच्या आक्रोशाने मुस्कान लालसिंग मेवाड ( वय ६ ) ही मुलगी बाजूला पळाल्याने तीचे दैव बलवत्तर म्हणून बचावली आहे .
याबाबत समजलेली हकीगत अशी की, रविवारी रात्री अवकाळी पाऊस येण्याचा अंदाज आल्याने सरकी पेंड पोती भरलेला टेम्पो क्रमांक एमएच १६ सी डी ९७४७ च्या चालकाने या जिनिंगच्या शेडमध्ये लावला . याच शेडमध्ये मध्यप्रदेशातील जिनींगमध्ये मजूरी करत असलेले लालसिंग मेवाड आपल्या तीन्ही लहान मुलांसह झोपले होते.
दरम्यान मेवाड हे आपल्या तीन्ही मुलांना तेथेच झोपवून कामासाठी बाहेर गेले होते सकाळी साडे सहाच्या सुमाराला टेम्पो घेऊन जाण्यासाठी चालक तेथे आला. त्याने टेम्पो सुरु करुन वळुन घेण्यासाठी पाठीमागे घेतला. टेम्पो मागे घेत असतांना तो सरळ झोपलेल्या दोन मुलाच्या अंगावर गेल्या ती जागेवर चिरडली जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीसरी मुलगी त्यांच्या आवाजाने भेदरून बाजूला पळाली त्यामुळे ती बचावली .
यावेळी जिनिंगवर काम करणार्या कामगारांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मुलांची अवस्था पाहून त्यांच्या आईवडिलानी दुःखाच्या आंकांताने टाहो फोडला हा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा होता .
तेथे टेम्पो चालक व उपस्थित यांच्यात शाब्दीक चकमक झाली . कामगारांनी टेम्पो चालकास तेथील कार्यालयात कोंडून ठेवले .
या घटनेची माहिती शेवगाव पोलिसांना समजल्यावर त्यांनीही घटनास्थळी धाव घेत टेम्पो व चालकास ताब्यात घेतले . तेव्हाही कामगार व टेम्पो चालक यांच्यात वाद झाला. घटनास्थळाचा पंचनामा करुन दोन्ही बालकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले टेम्पो शेवगाव पोलिस ठाण्यात लावण्यात आला आहे . सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती .
*ताजा कलम*.
*उन्हाळा सुरु असल्याने लहान मुले मुके प्राणी चारचाकी वाहनांच्या आडोश्याला सावलीधे वाहनाच्या खाली खेळत असतात याची वाहन चालक यांनी खात्री करून घेऊन आपले वाहन सुरु करून मार्गस्थ केले पाहिजे म्हणजे अशी काळीज पीळवटुन टाकणारी घटना चुकुन घडणार नाही.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*
Leave a Reply