प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी ता.शिरपूर येथे ‘मानव विकास मिशन कार्यक्रम’ अंतर्गत गरोदर महिला, बालकांची तपासणी शिबिर संपन्न.!
मानव विकास कार्यक्रम.
मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने मानव विकास कार्यक्रम राज्यातील अनेक जिल्ह्यात, तालुक्यात सुरू केला आहे. त्यात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आले. याप्रमाणे प्राधान्याने कुपोषित बालके, कमजोर माता, गरोदर महिला यांची परिपूर्ण तपासणी,त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्यानुसार उपचाराची सुविधा करणे अशा सर्वच बाबींचा अंतर्भाव कऱण्यात आला आहे.
डॉक्टरांकडून तपासणी व उपचार शिबिर.
प्राथमिक आरोग्य केंद्र, बोराडी येथे आज दिनांक ९मार्च रोजी “मानव विकास मिशन कार्यक्रम’ अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बुडकी, न्यू बोराडी, उपकेंद्र कोडीद, उपकेंद्र फत्तेपूर, उपकेंद्र मालकातर अंतर्गत ८४ गरोदर माता, अतिजोखिमेच्या माता १३, तीव्र रक्तक्षय माता ७ व बालके ० ते ६ महिने मधील १८ व ६महिने ते २ वर्षांपर्यंत ७ असे एकूण २५ बालकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले.
ह्यावेळी स्रीरोग तज्ञ डॉ.राहुल कामडे सर, बालरोगतज्ञ डॉ.विशाल शिवदे सर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, डॉ.अनंत पावरा, डॉ.पूजा मरळे, प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडीचे आरोग्य कर्मचारी व आरोग्य अधिकारी, उपकेंद्र कोडीद, उपकेंद्र मालकातर, उपकेंद्र फत्तेपूर, उपकेंद्र बुडकी येथील आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गट प्रवर्तक, आशा वर्कर्स कर्मचारी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी कॅम्प ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी येथे उपस्थित होते.
Leave a Reply