Majhi Kanya Bhagyashree’ Yojana Best Information In marathi : नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजना संबधित माहिती देत आहे. जर तुम्हला लहान मुलगी असेल तर हि योजना आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत. हि योजना, उद्दिष्ट्य लाभ, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. मित्रांनो मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया कैली तरच मिळतात ५० हजार. या योजनेचे लाभ हे सर्वाधिक मिळणारे आहेत. त्यामुळे या योजनेचे लाभ नक्कीच वाचा. पात्र असल्यास अवश्य या योजनेचा लाभ घ्या.
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना : मुलींचा जन्मदर सुधारण्याचा उपक्रम
मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, जन्मदर प्रमाण सुधारण्याबरोबरच स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना १ एप्रिल २०१६ रोजी सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत, ज्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. त्यांच्या मुलीच्या नावावर शासनाकडून ५० हजार रुपये जमा केले जातात. ज्यांना दोन मुलीच आहेत. त्या पालकांच्या मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार जमा केले जातात.
Related Post.
- मुलीच्या विवाह साठी सरकार देत आहे पैसा.
- किशोर वयीन मुलींसाठी योजना २०२३
- निराश्रित महिला साठी योजना २०२३
मात्र, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पुढील सहा महिन्यात आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.
एका मुलीनंतर ५० हजार, दोन मुलींनंतर २५-२५ हजार
ज्या पालकांनी एकाच मुलीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर नावे ५० हजार रुपये दिले जातात. दोन मुली असलेल्या पालकांनी जर शस्त्रक्रिया करवून घेतली तर २५ हजार रुपये प्रत्येकी दोन्ही मुलीच्या नावे फिक्स डिपॉझिट केले जातात.
योजनेचा लाभ कसा घ्याल?
मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने बँकेत खाते उघडले जाते. एका मुलीच्या जन्मानंतर आईने किया वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर ५० हजार तर दोन मुलींच्या जन्मानंतर दोघीच्या खात्यावर २५-२५ हजार जमा होतात.
माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 ची कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पत्ता पुरावा
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
सहा महिन्यांनंतर शस्त्रक्रिया वर्षभरात ८८ लाभार्थी
एका मुलीच्या जन्मानंतर एक वर्षांच्या किंवा दुसरी मुलगी जन्मल्यानंतर सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करावे लागते, योजनेअंतर्गत मुलीला व्याजाचे पैसे मिळणार नाहीत. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला पूर्ण रक्कम मिळण्यास पात्र असेल.
जिल्ह्यात ८८ लाभाथ्र्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव दुसऱ्या मुलीनंतर शस्त्रक्रिया केलेल्या पालकांची आहेत. याबाबतचे प्रस्ताव मंजुरीनंतर रक्कम देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
योजनेसाठी लागणारी पात्रता.
महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख रुपये आहे. तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अर्जदाराचे आधार कार्ड, आईचे किंवा मुलांचे बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर, पत्त्याचा पुरावा आदी.
अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायच्या असेल तर माहिती जाणून घ्या तसेच आम्ही दररोज शासकीय योजनांची माहिती दिलेल्या ग्रुप वर शेअर करीत असतो. तर आताच लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा.
Telegram
: Link
Facebook
: Link
Leave a Reply