खासगी रुग्णवाहिकेकडून रुग्णांची मोठी लूटमार.

खासगी रुग्णवाहिकेकडून रुग्णांची मोठी लूटमार तीनशे मीटरसाठी रुग्णवाहिकेने घेतले तब्बल ८५० रुपये.

अगदी असाच प्रकार वाशीच्या एका खाजगी चाईल्ड हॉस्पिटलमधून मागेच म्हणजे केवळ ५०० मीटर ते केवळ १ किलोमिटर अंतरावर असलेल्या फोर्टिस हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी तब्बल ३ हजार रुपये आकारण्यात आले होते.

शिवाय त्या खाजगी हॉस्पिटलने, बाळाला काहीही झालेलं नसताना, ६ दिवस ऑडमीट करून, जवळपास ६१ हजार बिल केल्यानंतर पाठीमागेच असलेल्या फोर्टिस हॉस्पिटलला हलवण्याचा धक्कादायक निर्णय परस्पर घेतला. 

फोर्टिसला हलवल्यानंतर तो खाजगी डॉक्टर दररोज सकाळ संध्याकाळ फोर्टिस हॉस्पिटलमध्ये visit ला येत होता त्याचे, सकाळचे १५०० रुपये आणि संध्याकाळचे १५०० रुपये असे दररोज ३००० हजार रुपये, visiting चार्ज लावले जात होते,  

बाळ ऑडमीठ फोर्टिस मध्ये आणि दररोज ३००० हजार रुपये तो खाजगी डॉक्टर visiting चे पैसे घेत होता.

शिवाय फोर्टिस हॉस्पिटलने भाडोत्री कामावर ठेवलेला एक डॉक्टर सकाळ संध्याकाळ राऊंड मारायचा त्याचे सकाळ, संध्याकाळचे प्रत्येकी ७५० रुपये याप्रमाणे १५०० रुपये बिल लावले जात होते.

म्हणजे दरदिवशी ४५०० रुपये फक्त डॉक्टरांच्या visit चे होत होते.

केवळ ९ दिवसाचे जवळपास ५६ हजार रुपये बिल डॉक्टरांच्या visit चे केलं होते.

या सगळ्या प्रकारावर शंका आल्याने एक दिवस सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत हॉस्पिटलच्या बाहेर बसून राहिलो रात्री जाताना बिलाची प्रिंट घेतली, 

दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर पुन्हा बिलाची प्रिंट घेतली तर, त्या दिवशी तो खाजगी डॉक्टर visit ला आलेला नसतानाही फोर्टिस हॉस्पिटलने चक्क ३००० रुपये बिल लावलेलं होते.

हा सगळा प्रकार बघून पूर्ण दिवसाचे सीसीटिव्ही फुटेज मागितल्यावर भंबेरी उडालेल्या हॉस्पिटलने ३ लाख ५० हजाराचे बिल २ लाख ६१ हजार करून दिले होते.

पण तरीही फसवणूक झालेली होती, हे सगळे प्रकार मेडीक्लेम असल्याने केले जातात, अक्षरशः जीवाशी खेळ खेळले जातात, आजही चालूच आहेत.

मात्र अशीच पद्धत सर्वसामान्य माणसा सोबत सुद्धा केली जातेय.


शिवाय ही लूट बघून तत्काळ डिस्चार्ज घेण्याचा निर्णय घेतल्यानंतरही मुजोर हॉस्पिटल डिस्चार्ज देण्यास तयार नव्हते, शेवटी बाळाला काही झाल्यास आम्ही जबाबदार नाही असे लेखी लिहून घेतले, आम्ही पालक आमच्या जबादारीवर डिस्चार्ज घेत आहे असेही लिहून घेतलं.

आणि आपल्या माहितीसाठी बाळाला काहीही झालेलं नव्हते तर बाळाचे वजन १७५० ग्राम होते हीच बाळाची चूक होती.


सोबत माहितीसाठी काही पुरावे जोडले आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !