Adivasi Holi 2024 : आज नवागावची होळी आहे. खान्देशातील सातपुडा परीसरातील मानाची होळी म्हणुन प्रसिध्द असलेली नवागाव होळी – या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये आगामी पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळते. ( Adivasi Holi )
Adivasi Holi : आदिवासी समाजाचा महत्वाचा सण
आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय.धुळे जिल्ह्यातल्या शिरपुर तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांगेतील *नवागाव* येथे साजरा होणारा होलिकात्सव मोठ्या थाटात संपन्न होतो.
आदिवासी समाज जीवनात अतिशय महत्वाचे स्थान असलेला होळी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. फार प्राचिन काळांपासुन सुरु झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि समानतेतील वैविध्याचे रंग आणि पारंपारिक स्वरूप कायम ठेवून आहे.
सातपुड्याच्या डोंगर रागांमधील नवागावची होळीत रात्रभर ढोलाच्या तालावर आदिवासी पारंपारीक नृत्य होते.जवळपास शंभर ढोल येथे असतात.या ठिकाणी ढोल वाजविण्याची स्पर्धा देखिल आयोजित केली जाते.आदिवासी बांधव ही होळी पारंपारिक पद्धतीने साजरी करतात.ढोल,बासरी,घुंगुरु व सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपारिक पेहराव येथे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत असतो.
स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपारिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणारे आदिवासी बांधव पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटवतात यामागे वर्षभराच्या कष्टाचे बळ सोबत घेऊन येते अशी धारणा आहे. आदिवासी संकृतीत पुरुष महिला असा भेदाभेद नाही. गरीब – श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते.
सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये मानाची होळी म्हणून लौकिक असलेल्या नवागावची होळी सालाबादाप्रमाणे आज मोठ्या धूम धडाक्यात साजरी होत आहे. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. कुणालाही आमंत्रण दिले जात नाही की कुणाला मानसन्मान दिला जात नाही येथे सर्व समान असतात,तरी या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषेत काठीच्या होळी उत्सवात सामील झाले होतात.
रात्रभर बेधुंद होऊन नाचणारे आदिवासी बांधव आणि त्यांच्यातली ऊर्जा पाहिल्यावर येथे येणारा प्रत्येक जण भारावून जातो.सामाजिक एकोपा आणि एकमेकांप्रती असलेला आदर भाव हा या समाजाला अजूनही एकत्र ठेवून आहे.
होळी पांच दिवसीय उत्सव ( Adivasi Holi )
होळी हा सण आदिवासी समाजातील सर्वात पवित्र सण मानला जातो. आदिवासी समाजात महिलांना सन्मान दिला जातो.होळी ही कुठून तरी बांबू आणून रोपून जाळत नाहीं तर ज्या गावाची होळी असते,म्हणजे लाकुड रचून अग्नी लावतात, त्या गावचे प्रमुख पांच पंच पाटील, पुजारा, डायला, वारती, कोतवाल असे पांच पंच मिळून ज्या ठिकाणी सरळ व लांब बांबू असतात त्या ठिकाणी होळीच्या एक सव्वा महिन्याआधी जाऊन एका बांबूला दोरा बांधून येतात, नंतर त्या गावाची होळीच्या दिवसी पाच लोकं जातात त्या बांबूला तोडत नसून मुळा सकट काढून आणतात रस्त्यात कुठे ही खाली ठेवत नाही.सरळ ज्या ठिकाळी होळीच्या ठिकाणी मोजून आणतात. परत रोपण्याच्या वेळी मोजतात निश्चित पणे लांबी ही वाढलेली असते.
Adivasi Holi Festival Other Information
रोपल्या नंतर सर्व प्रथम तेंदूचे फाद्या आजूबाजूला रचतात नंतर काडी कचरा कमी स्वरूपात लाकूडचाही वापर करतात.रात्रभर त्या गावाचे,परिसरातील आजूबाजूचे लोकं ढोल,घेर नृत्य पथक घेऊन येताना रात्रभर नाचतात आणि पहाटे चार वाजले की,गावपाटील,गावडायला यांच्याच हस्ते होळी पेटवली जाते.
जवळ जवळ सर्व गावाकऱ्यांचा उपवास असतो आणि होळीच्या दिवशी विशेष जेवण तयार केलेले असते ते जेवण ही सर्व जण थोडं थोडे होळीच्या ठिकाणी नेतात,होळी पूर्ण जळाल्या नंतर खाली पडते होळीचा शेंडा हे कोणत्या ही परिस्थितीत खाली पडू देत नाहीं तर वरच्या वर झेलावे लागते.
पूर्ण खाली पडल्यानंतर प्रत्येक गावाच्या प्रतिष्ठित व्यक्तीला सन्मान दिला जातो एक व्यक्तीचे नाव पुकारून बोलवून तलवारीने किंवा फाव्याने फूट भर तुकडा तोडायला लावतात सर्व तोडून झाल्या नंतर शेंडा जो असतो तो मान सन्मान म्हणून एखादा मोठा घेर नृत्य पथक आलेले असते त्यांना देतात.दोन मोठं मोठे तुकडे तोडून होळीच्या पश्चिमेला रोपतात.तेथून जे जेवण बनवलेले असते ते होळी ला भोग देतात नंतर महिला पुरुष विवाहित अविवाहित कोणीही असो एका टोपलीत दाळ्या,नारळ,गूळ असे ठेवून होळीच्या पाच फेर मारून ते सामान त्यात टाकत फिरत असतात.
Adivasi Holi Melada Time Table List 2024
सर्व दुःख हे त्या मध्ये विसर्जन करतात.विशेष म्हणजे आदिवासी भागात देवीची साथ, किंवा डोळे दुखणे हे होळीच्या महिन्यात येत असते ते सर्व दुःख होळीत विसर्जन करून आपली मानता सुटत असतो
होळी कधी आणि कुठं असते. ( Adivasi Holi )
कॅलेंडरच्या होळीच्या आदल्या दिवस पासून होळी उत्सव सुरु होऊन जातो. दि.24/3/2024 ला होळी आहे 23 ला शिरपूर तालुक्यातील नवागावं,सामऱ्यापाडा असे पहिली राव्वी होळी असते या ठिकाणी सातपुड्यातून अनेक ठिकाणाहून लोकं येतात.
24 ला बोराडी,चोंदी पाडा,फत्तेपूर,चाकडू, 25 ला बोरपाणी, मालपूर,मालकातर, असे एकूण पांच दिवस होळी राहते प्रत्येक दिवस तिनं तीन चार चार गावात होळी असते. अशा या पांच दिवसात संपूर्ण गावात होळी साजरी केली जाते
- नवस पाडून शरीरावर साज चढवला जातो,पाच दिवस ते कपडे काढायचे नाहीं अंघोळ करायच नाहीं,धुवायचे नाहीं
- पांचव्या दिवशी पूजा विधी करून कपडे उतरवले जातात.होळी
- फाल्गुन महिन्यात येते म्हणून फाग मागणे हि म्हणतात.
Conclusion :
Adivasi Holi : होळी नंतर ‘मेलादा’ उत्सव साजरा होतो.मेलादा म्हणजे एक प्रकारे पुर्ण गावाचा नवस. जळीत विस्तवावर चालुन ग्रामस्थ नवस फेडतात.गावात सुख-शांती नांदो,शेतातील उत्पनात वाढ होणे,रोगराई होऊ नये या श्रध्देने निर्सगदेवताचे ऋण फेडण्याचा जणु नवस असतो. माहिती स्रोत – प्रा.दशरथ पावरा,प्रा.आर.जी.पावरा.
अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या https://graminbatmya.in/ अधिकृत संकेतस्थळ ला दरोरोज भेट द्या आणि शासकीय योजनांची माहिती, कानून कायदे, ग्रामपंचायत च्या माहिती, केंद्र , आणि राज्य सरकारच्या योजनांच्या माहिती साठी आमच्या सोसिअल मेडिया ला भेट द्या. किंवा फोल्लो करा. धन्यवाद .
Important Link
You Tube Channel Link
WhatsApp Channel Link
Instagram Channel Link
Facebook Channel Link
Leave a Reply