वाळूजच्या सरपंच-उपसरपंचासह सर्व सदस्य अपात्र मोबाइल टॉवरसाठी प्रमाणपत्र देणे भोवले; ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई : All members including Sarpanch Upasarpanch became disqualified
वाळूज महानगर : खासगी कंपनीला मोबाइल टॉवर उभारण्यासाठी मासिक सभेत ना हरकत प्रमाणपत्र देणे वाळूज ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना भोवले आहे. या नियमबाह्य ना हरकत प्रमाणपत्रामुळे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी सरपंच, उपसरपंचासह सर्व सदस्यांना अपात्र ठरवले.
हे ठरले अपात्र : All members including Sarpanch Upasarpanch became disqualified
सरपंच सईदा पठाण, उपसरपंच योगेश अरगडे, सदस्य अमिनाबी पठाण, पोपट बनकर, आशाबी शेख, राहुल भालेराव, मंजूषा जयस्वाल, फिरोज पठाण, नम्रता साबळे, तौफिक शेख, शमीम शेख, रंजना भोंड, विमल चापे, सचिन काकडे, कल्पना तुपे, युसूफ कुरेशी, समिना पठाण या १७ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Related Post :
- Sarpanch declared ineligible | सरपंच अपात्र घोषित, कागदपत्रांसह तक्रार.2 मिनिट काढून वाचा.
- सरपंच चे कार्य, जबाबदारी आणि अधिकार काय आहे. Sarpanch Che Kary in Marathi
शासनाकडे दाद मागणार : सईदाबी पठाण : All members including Sarpanch Upasarpanch became disqualified
सरपंच सईदाबी पठाण म्हणाल्या की, ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले, त्या मासिक
सभेला वैद्यकीय कारणामुळे मी गैरहजर होते. मासिक सभा उपसरपंच योगेश अरगडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असताना मला अपात्र तरविणे हा माझ्यावर अन्याय आहे. या प्रकरणी सर्व सदस्यांसह आम्ही शासनाकडे दाद मागू,
मोबाइल टॉवर उभारण्यासाठी १५ मार्च रोजी ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. दोन वर्षांपूर्वी उपसरपंच योगेश अरगडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मासिक सभेत परवानगी देण्यात आली. कंपनीने फायबर केबल टाकून जिओ डिजिटल फायबर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दोन वर्षांपूर्वी वाळूजला फायबर केबल व नवीन गावातील आश्रम शाळेजवळ मोबाइल टॉवर उभारला. भय्यासाहेब चव्हाण यांनी गटविकास अधिकारी, पं. स., जि. प.कडे तक्रारी केल्या.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.
Related Notification Information : All members including Sarpanch Upasarpanch became disqualified | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Official Website Information | Click Here |
Leave a Reply