आशा स्वयंसेविका आरोग्या संदर्भात जागरूकता Asha Volunteer Health Awareness In Marathi
केंद्र शासनाने दिनांक १२ एप्रिल, २००५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान Maharashtra (NRHM) राज्य पातळीवर राबविण्यास सुरवात केली. या अभियानाअंतर्गत विशेषतः ग्रामीण पातळीवर आरोग्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका Accredited Social Health Activist म्हणून गावातील स्थानिक महिलांची नेमणूक केली. आशा स्वयंसेविकां महत्वपूर्ण आरोग्य सामाजिक दुवा म्हणून राज्यात कार्य पार पाडत असतात.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील Asha Volunteer Health Awareness In Marathi
शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याची कामगिरी आशा स्वयंसेविका बजावत असतात. या लेखात आशा स्वयंसेविका विषयी माहिती, आशा स्वयंसेविका मानधन, आशा स्वयंसेविका नियुक्ती प्रक्रिया, आशा कार्यकर्ता लिस्ट इत्यादी बाबत माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. ग्रामपंचायत भ्रष्टाचार ग्रुप
ASHA ची ठळक वैशिष्टये. Asha Volunteer Health Awareness In Marathi
- • प्रत्येक गाव-खेड्यात सामाजिक कार्यकर्ता म्हणुन आरोग्य सुविधा देण्यासाठी आशा स्वयंसेविका कार्यरत असतात.
- • आशा सेविकेची गावातील गावातील स्थानिक विवाहित महिलेची ग्रामसभेद्वारे निवड केली जाते.
- • महाराष्ट्र राज्यात ७१ हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत आणि आरोग्यविषयक शासनाने नेमून दिलेल्या एकूण ७८ सेवा त्यांना लोकांना प्रदान कराव्या लागतात.
- • ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची सदस्य सचिव अंगणवाडी सेविकेऐवजी आशा स्वयंसेविका असतात. (शासन निर्णय – साआवि- २०१७/प्र. क ३३७/आ-७).
- • आशा स्वयंसेविकेच्या कार्यप्रणालीस गती येण्यासाठी तसेच त्यांच्या कामाचे मोजमाप व व्यवथापन करण्याकरिता जिल्हा पातळीवर १ जिल्हा समूह संघटक व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एका गट प्रवर्तकांची नेमणूक करण्यात आलेली असते.
ASHA आशा स्वयंसेविका नियुक्ती प्रक्रिया | Asha Volunteer Health Awareness In Marathi
- • आशा स्वयंसेविका किमान १० वी पास असावी.
- • वयोमर्यादा २५ ते ४५ वर्षे व विवाहीत महिला असावी. विधवा/घटस्फोटीत/ परितक्त्या यांना प्राधान्य देण्यात येते.
- • आशाची निवड ग्रामसभेमार्फत केली जाते.
- • ग्रामसभेने निवडलेल्या आशाची नियुक्ती तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येते.
- • गावातील १५०० लोकसंख्येमागे एका आशे ची निवड केली जाते व त्यापुढील प्रत्येकी १००० लोकसंख्येच्या प्रमाणात एका आशेची निवड करण्यात येते
- • आशाच्या नियुक्तीनंतर २३ दिवसांचे प्रशिक्षण ५ टप्प्यात दिले जाते.
- • आशाने केलेल्या कामाच्या स्वरूपावर त्यांना मोबदला दिला जातो.
आशा स्वयंसेविका महत्वाची कर्तव्य, कामे व जबाबदाऱ्या / आशा वर्कर ची कामे.
- • आरोग्य बाबतीत लोकांमध्ये मानसिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणणे.
- • आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी गावातील जनतेला प्रोत्साहीत करणे.
- • गावातील आरोग्य संस्थेतील प्रसूतीमध्ये वाढ करणे.
- • मलेरिया, क्षयरोग, साथीचे रोग उपचारासाठी मदत करणे.
- • रुग्णास रुग्णालयात पोहचविण्यासाठी सहाय्य करणे.
- • कुटुंब कल्याण प्रचार, सॅनिटरी पॅड, गर्भनिरोधकाचे वाटप मोफत/माफक दरात करणे.
- • साध्या आजारावर उदा. ताप, खोकला यावर प्राथमिक वैद्यकीय सेवा पूरविणे व औषधोपचार करणे.
- • प्रसूतीपूर्ण तपासणी, लसीकरण, स्तनपान, आहार इत्यादी बाबत माता व बाल आरोग्याविषयी प्रबोधन करणे.
- • गावपातळीवर आरोग्य नियोजन करण्यात सहभागी होणे व अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका/सेविका यांच्यासह विचारविनिमय करणे.
- • प्रत्येक जन्माची व उपजत मृत्यूची नोंद ठेवणे, आपण केलेल्या कामाची रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवणे इत्यादी आरोग्य विषयक महत्वपूर्ण नोंद ठेवणे.
- अशा प्रकारच्या आरोग्यविषयक ७८ सेवा आशा स्वयंसेविका ग्रामीण पातळीवर शेवटच्या टप्प्या पर्यंत पुरवत असतात.
केंद्र सरकारच्या ७८ सेवांपैकी आशा सेवकांची नियमित ४ कामे व दरमहा मोबदला पुढीलप्रमाणे: Asha Volunteer Health Awareness In Marathi
- १. आशाला नेमून दिलेल्या भागातील सर्व लाभार्थ्यांची यादी करणे, दिलेल्या सेवांची माहिती व अहवालाचे अचूक संकलन आणि वरिष्ठांना सादर करणे. – रु.१५००/-
- २. ग्राम आरोग्य पोषण दिवस अंमलबजावणी – या दिवशी सेवा देण्यासाठी आवश्यक असणारे बालके, माता, कुटूंब कल्याण लाभार्थी इत्यादींना सेवा घेण्यासाठी प्रवृत्त करणे. – रु.२००/-
- ३. ग्राम आरोग्य, पोषण आणि स्वच्छता समितीची मासिक सभा समितीच्या सचिव या नात्याने बोलावणे, सभेचे इतिवृत्त तयार करणे, त्यास मान्यता घेणे आणि सभेतील निर्णयांच्या अंमलबाजावणीची समितीस माहिती देणे. – रु. १५०/-
- ४. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील मासिक बैठकीत हजर राहून महिन्यातील केलेल्या कामाचा आढावा देणे. – रु.१५०/-
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या निर्धारती निकष दरानुसार इतर निर्धारित ७४ सेवां बाबतीत आशा सेविकांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्यात आली नाही.
आशा कार्यकर्ता लिस्ट । आशा स्वयंसेविका महाराष्ट्र ऑनलाईन यादी : Asha Volunteer Health Awareness In Marathi
आशा कार्यकर्ता लिस्ट महाराष्ट्र ऑनलाईन यादी पाहण्यासाठी, तसेच, गावातील ग्रामसेवक, आरोग्य सेविका. यांची यादी पाहण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत ला माहितीचा अधिकार अंतर्गत अर्ज करा नक्कीच माहिती आणि यादी मिळेल.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.
Related Notification Information : Asha Volunteer Health Awareness In Marathi | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Official Website Information | Click Here |