आपल्या जवळच्या व्यक्तीला Block-Unblock करावे की नाही.

आपल्याच मित्र-मैत्रीणी, सहकारी, नातेवाईक स्नेहीजनांना Block-unblock करावे की नाही. सध्या माणसांना एकमेकांचा राग आला कि एकमेकांचे फोन नंबर ते ब्लॉक करतात. नंबर ब्लॉक होतो.

Block-Unblock
Block-Unblock

पण प्रेम ब्लॉक होत कां? आठवणी ब्लॉक होतात का? ज्या आठवणी कायमच्या हृदयात ब्लॉक असतात त्या अशा नंबर ब्लॉक केल्याने मिटतात का? हो. त्या माणसांचा संवाद थांबतो एकमेकांशी होणारा. पण एकमेकांचे विचार थांबतात का?

विचार ब्लॉक होतात का? Block-Unblock

संवादाची जागा वादाने घेतली कि नंबर ब्लॉक होतो. नंबर ब्लॉक करण्याऐवजी आपल्यातला अहंकार ब्लॉक झाला तर नंबर अनब्लॉक होईल. माणसं अहंकाराच कवच इतकं कठीण करून का फिरतात? आपल्याच माणसांसाठी हे कवच आपण फोडू शकणार नाही का?

अहंकार ब्लॉक केला तर प्रेम अनब्लॉक होईल Block-Unblock

आपल्या प्रियजनांसाठी आपण एक पाऊल स्वतः आधी उचललं तर सेल्फ रिस्पेक्ट ज्याला आपण म्हणतो तो कमी होतो म्हणे असं मन सांगतं. अरे अहंकारी मन जपण्यात कसला आलाय रे सेल्फ रिस्पेक्ट. ब्लॉक करण्यासाठी एकमेकांच्या किती वाईट गोष्टी आहेत कि राग, द्वेष, मत्सर, गैरसमज, कटुता हे सगळं ब्लॉक करूया कि नंबर ब्लॉक केल्याने हे सगळे जिंकतील रे. तु ह्यांना फक्त दोन दिवस ब्लॉक करून पहा.मग तुला कळेल एखाद्याचा प्रेमरूपी मोबाईल कितीदा रिंगटोन देऊन गेलाय तुझ्या मनात.

Related News :

एकदा तुही कॉल करून पहा एखाद्याचा प्रेमाला मग मला सांग तुमच्या प्रेमाची जी कॉलरट्यून तुम्ही ठेवलीये ती किती गोड वाजते ते. ती ऐकण्यात मंत्रमुग्ध ब्लॉक होतात का!.  पण एकदा एखाद्याच प्रेम अनब्लॉक करून तर पहा. एकदा तर रिसिव्ह कर एखाद्याच्या मनाचा कॉल मग ठरव हवं तर ब्लॉक करायचा कि अनब्लॉक. Block-Unblock

#मनोरंजन #माहिती #ब्लॉक मित्र #वॉट्सअप post #Block #Unblock

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *