बोराडी येथे ऐतिहासिक “विश्व विधवा दिवस” मोठ्या दिमाखात साजरा.!
शिरपूर प्रतिनिधी : आज दिनांक २३ जून रोजी “विश्व विधवा दिवस” निमित्ताने झुंजार महिला आदिवासी सेवा संस्था, आदिवासी एकता परिषद आणि देवमोगरा माता मंदिर ट्रस्ट बोराडी ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने शिरपूर तालुक्यातील व बोराडी परिसरातील महिलांनी एकत्र येऊन विधवा महिलांसाठी कुटुंबीक, सामाजिक, मानसिक आधार त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना सामाजिक अधिकार व त्यांना शासनाकडून देऊ केलेल्या सगळ्या योजनांची माहिती देणेसाठी आज आई देवमोगरा माता मंदिर बोराडी येथे हजारोंच्या संख्येने महिला ह्यांनी एकत्र येऊन, आपल्या गावपरीसरातील महिला ह्यांनी एकत्र येऊन “महिला प्रबोधन मेळावा” घेऊन एक सामाजिक संदेश दिला आहे.
ह्यावेळी अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्या सरिताताई विशाल पावरा, उद्घाटक म्हणून बोराडी गावाचे उपसरपंच राहुलजी रंधे लाभले.
ह्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून आदिवासी साहित्यिक वाहरुदादा सोनवणे, इंदिरा पावरा, दर्शना पवार, डॉ.हिरा पावरा, डॉ.संदीप वळवी हे लाभले.
ह्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बोराडी गावाचे सरपंच सुखदेव भील, डॉ.आपसिंग वसावे, राजू सूर्यवंशी, प्रमिला पवार, सुनीता सगरे, माया नागपुरे, संगीता तोरवणे व अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दिली.
प्रास्ताविक आदिवासी एकता परिषदेच्या रंजना पावरा ह्यांनी मांडले त्यात त्यांनी विश्व विधवा दिनाचे महत्व व विधवा महिला ह्यांच्या जीवनातील सामाजिक व कुटुंबीय समस्या ह्यावर सखोल मार्गदर्शन देतांना उपस्थितांचे अश्रू अनावर झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले बोराडी गावाचे उपसरपंच राहुलजी रंधे ह्यांनी उपस्थित महिलांना विधवा महिला ह्यांना शासनाकडून मिळत असणाऱ्या योजना ह्यांची सखोल दिली व योजना राबवण्याचे व ते करत असताना येणाऱ्या अडचणीत कायम सोबत राहण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले.
आदिवासी साहित्यीक वाहरूदादा सोनवणे ह्यांनी आपल्या संभाषणात सांगितले की पुरुषप्रधानतेखाली महिला दबलेल्या आहे, आपल्या हक्कासाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी महिला आता लढत आहे आणि त्यासोबत विधवा महिलांवर विधवा म्हणून अनेक बंधने लादली गेलेली आहेत ती बंधने पुरुषांवर का काही असा प्रश्न उपस्थित करत पुरुष विधुर झाल्यावर त्यांची सुद्धा एका बाजूची मिशी कापली जावी व त्याची विधुर म्हणून ओळख केली जावी तसे नसेल तर विधवेवरील बंधने सुद्धा नको असे मनोगतात सांगितले. गावातील पाच पांचांमध्ये महिलांना स्थान का नाही असा प्रश्न उपस्थित करत महिलांना सुद्धा तिथे स्थान हवे असे आवर्जून सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार ह्यांनी पुरुष आणि महिला समान आहे पुरुषांचे जेवढे अधिकार तेवढेच अधिकार महिलांचे आहे, महिलांना गरोदरपण आहे ते पुरुषांत नाही आहे एवढाच फरक स्री आणि पुरुषांत आहे बाकी पुरुष व महिला समान आहे असे आवर्जून स्थानिक मातृभाषा अहिराणी भाषेत आपले मनोगत व्यक्त केले.
इंदिरा पावरा ह्यांनी कायद्याच्या दृष्टीने विधवा महिलांना मार्गदर्शन करून उपस्थित महिलांचे मनोबल वाढविले, शासन प्रशासन दरबारी पंचव्यवस्था काय आहे ते सखोल समजावून सांगितले.
डॉ.हिरा पावरा ह्यांनी उपस्थित महिलांना समाजातील होणारे बालविवाह व पुरुषांतील व्यसनाधीनता मुळे आलेले विधवापण व त्यामुळे होणारे मुळे समाजाचे झालेले व होणारे शारीरिक, कुटुंबिक, सामाजिक नुकसान ह्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
डॉ.संदीप वळवी ह्यांनी सुद्धा बालविवाह मुळे होणारे दुष्परिणाम आपल्या मातृभाषेत सखोल मार्गदर्शन केले.
ह्यावेळी उपस्थित एकूण हजारो महीलांपैकी सुमारे ९३ महिलांना विधिवत टिकली बांगडी हळद कुंकू लावून त्यांना त्यांचे सन्मान करण्यात आले. ह्यावेळी सर्वांचे संस्थेचे सचिव आभार अंजली पावरा ह्यांनी केले.
Leave a Reply