दिव्यांग प्रमाणपत्र वाटपासाठी ४ नोव्हेंबर पासून तालुकानिहाय शिबिरे.
Disability Certificate | दिव्यांग प्रमाणपत्र वाटप. |
अहमदनगर, २ नोव्हेंबर – दिव्यांग प्रमाणपत्र वाटपासाठी ४ नोव्हेंबर तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांचा दिव्यांगा बांधवांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्हा रूग्णालयांत दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी तपासणीचे कामकाज केले जाते. मात्र जिल्ह्यात दिव्यांग बांधवांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एकाचवेळी दिव्यांगांची प्रमाणपत्रासाठी गर्दी होते.
तालुकानिहाय प्रमाणपत्र वाटप.
तेव्हा ४ नोव्हेंबर २०२२ पासून बुधवार व्यतिरिक्त दर शुक्रवारी सकाळी ९ ते १२ या वेळेमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज तालुकानिहाय केले जाणार आहे.
यामध्ये दि.४ नोव्हेंबर रोजी राहूरी व अहमदनगर तालुका, दि.११ नोव्हेंबर रोजी अकोले व संगमनेर, दि.१८ नोव्हेंबर रोजी राहाता व कोपरगाव, दि.२५ नोव्हेंबर रोजी नेवासा व शेवगाव, दि. २ डिसेंबर रोजी पाथर्डी व श्रीगोंदा, दि. ९ डिसेंबर रोजी जामखेड व कर्जत व दि.१६ डिसेंबर रोजी पारनेर व श्रीरामपूर या तालुक्यांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
लागणारे कागदपत्रे.
शिबिरासाठी येतांना दिव्यांग व्यक्तींनी दोन पासपोर्ट साईज फोटो, शिधापत्रिका (मुळ प्रतीसह), आधार कार्ड व इतर औषधोपचारांच्या कागदपत्रांच्या छायाकिंत प्रती सोबत आणाव्यात.
ए” पार्ट म्हणजे काय?
तसेच ज्या दिव्यांग व्यक्तींनी प्रमाणपत्रासाठी “ए” पार्ट भरलेला आहे. त्यांनी मूळ एस. ए.डी.एम. प्रमाणपत्र व भरलेल्या अर्जाची प्रत सोबत घेवून यावी. असे आवाहनही श्री.घोगरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*
Leave a Reply