Gramin Batmya

weather today Live

शाळेची पायरी न चढलेला 'एकलव्य' निघाला जपानला, आदिवासीबहुल भागातील मिलेशची भरारी. Milesh Pawara Nighala Japan
Tribal Area News

शाळेची पायरी न चढलेला ‘एकलव्य’ निघाला जपानला, आदिवासीबहुल भागातील मिलेशची भरारी. Milesh Pawara Nighala Japan

शाळेची पायरी न चढलेला 'एकलव्य' निघाला जपानला, आदिवासीबहुल भागातील मिलेशची भरारी. Milesh Pawara Nighala Japan

Milesh Pawara Nighala Japan : महाराष्ट्राच्या नकाशातील उत्तर दिशेला शेवटचा जिल्हा म्हणजे नंदुरबार आहे. सातपुडा पर्वतांच्या रांगामध्ये वसलेले महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे तोरणमाळ.

सातपुड्यातील शाळाबाह्य विद्यार्थी मिलेश पावरा थेट जपानला आदिवासी बहुल जिल्ह्यातून पहिला थेट जपानला मिलेश पावरा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.

तोरणमाळ येथील मिलेश पावरा जपान येथे रवाना : Milesh Pawara Nighala Japan

सातपुडा पर्वत रांगामध्ये वसलेले महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे तोरणमाळ. तोरणमाळपासून २० किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम भागातील झापी-बोदीबारी पाडा येथील मिलेश झुंगाल्या पावरा हा शाळाबाह्य विद्यार्थी २०१७ मध्ये शाळेत प्रवेश घेत जागतिक स्तरावरील सायन्स लॅब पाहण्यासाठी जपानला आज १५ जून रोजी रवाना झाला.

तोरणमाळ परिसरातून विदेशात जाणारा मिलेश हा पहिलाच विद्यार्थी आहे. मोठ्या शहरांसाठी विदेशात जाणे ही मोठी बाब नसली तरी सातपुड्यातील दुर्गम भागातील शाळाबाह्य विद्यार्थ्याने शाळेत प्रवेश घेत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तो जपानला निघाला, ही बाब आकांक्षीत जिल्हा असलेल्या नंदुरबारला नक्कीच प्रेरणादायी आहे.

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरूच

नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. अनेक आघाड्यांवर असलेल्या जिल्ह्यांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी आकांक्षित जिल्हा म्हणून घोषणा केली. जिल्ह्यात स्थलांतरासह अनेक समस्या वर्षानुवर्ष आहेत. जिल्ह्यातील दुर्गम भागात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरूच असते. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही सातपुड्यातील अनेक विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे. यात आणखी निलेश पावरा या विद्यार्थ्याचे नाव वाढले आहे. महाराष्ट्राच्या नकाशातील उत्तर दिशेला शेवटचा जिल्हा म्हणजे नंदुरबार आहे.

आई-वडिलांचा मोलमजूरी करुन उदरनिर्वाह

सातपुड्याच्या पर्वत रांगांत कडेकपारीत अतिदुर्गम आदिवासी पाडे आहेत. तोरणमाळपासून दरीत २० किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम भागातील झापी-बोदीबारी पाडा या गावाला जाण्यासाठी नदी-नाले, डोंगर कपारीतून पायवाटेने जवळपास तीन तास पायी प्रवास करावा लागतो.

झापी-बोदीबारी पाडा येथील मिलेश झुंगाल्या पावरा हा आई वडिलांसह राहतो. मिलेशचे आई- वडील निरक्षर असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. निलेश हा शाळाबाह्य विद्यार्थी होता. त्याला जून २०१७ मध्ये तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय शाळेत दाखल करण्यात आले. त्याने शाळेत आपल्या गुणांची चुणूक दाखवली. मिलेश याने नुकतेच दहावीच्या परीक्षेत ८६% मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.

जपानला जाणारा महाराष्ट्रातून एकमेव :Milesh Pawara Nighala Japan

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई व समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत वंचित व दुर्बल घटकासाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात कस्तुरबा गांधी व महाराष्ट्रातील वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावरील सायन्स लॅब पाहण्यासाठी संधी मिळावी म्हणून भारत सरकारने सुकुरा सायन्स हायस्कूल प्रोग्राम २०२४ कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

यात जपान येथे जागतिक स्तरावरील सायन्स लॅब पाहण्यासाठी भारतातून २१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातून मिलेश पावरा हा एकमेव विद्यार्थी आहे. १० दिवस हे विद्यार्थी जागतिक स्तरावरील सायन्स लॅबमध्ये वेगवेगळी माहिती जाणून घेणार आहेत. जपान जाण्यासाठी मिलेश पावरा हा १४ जून रोजी मुख्याध्यापक सुधीर पाटील यांच्यासह दिल्ली येथे रवाना झाला.

१५ जून रोजी सायंकाळी जपान येथे मिलेशसह विद्यार्थी रवाना होणार आहेत. तोरणमाळ परिसरातील विदेशात जाणारा मिलेश पावरा हा एकमेव विद्यार्थी आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाला १५ जून रोजी सुरुवात होत आहे. त्याच दिवशी शाळाबाह्य विद्यार्थी मिलेश पावरा हा जपान येथे रवाना होत आहे. नवीन विद्यार्थ्यांना व आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना ही बाब नक्कीच प्रेरणादायी आहे.!

Read More :

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !