Pm Gharkul Yojana | केंद्र सरकारच्या 2024 पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घर.

केंद्र सरकारच्या 2024 पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घर यां योजनेला शेवगाव मध्ये हरताळ अनेक लाभार्थी जाचक  अटीमुळे वंचीत.

Pm gharkul Yojna
Pm gharkul Yojna 


तालुका प्रतिनिधी : गेल्या काही वर्षांपासुन शेवगाव  शहरात आणि तालुकायत ज्या लोकाना राहायला हक्काचे घर नाही. 

अशा  लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना मागासवर्गीयांसाठी रमाई घरकुल योजना यासाठी मोठ्या थाटात योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

पण संबंधीत योजनेचा लाभ बंगले रो हाऊस आणि मोठ्या हुशार लोकांनी ताबडतोब घेतला जे खरे लाभार्थी आहेत जे आजही  सपरात कुडात पत्र्याच्या पेटित  पडक्या घरात गावठाण च्या जागेवर ज्यांच्या उताऱ्यावर ग्रामपंचायतकालीन भॊगवटदार असा उल्लेख असलेल्या खऱ्या गोरगरिबांचा वाली कोण?

संबंधित लेख : घरकुल योजनेची ड यादी कशी पाहावी  

घरकुल साठी लागणारे  कागतपत्रे .

घरकुल ची कागतपत्रे सादर करतांना सिटी सर्वे चा उतारा मागितला जातो त्यामुळे शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत हि एक प्रकारची अडवणूकच आहे त्यात शेवगाव  शहरातील सिटी सर्वे 48 वर्षांपुर्वी 1974 रोजी झाले होता.

त्यानंतर फेर सर्वे न झाल्याने शेवगाव शहरातील अनेक मोक्याच्या जागांवर शेती किंवा गावठाण असा उल्लेख आढळतो त्यांचा गैरफायदा अनेक सरकारी बाबू आपला खीसा  गरम करण्यासाठी करतात घरकुलासाठी पेपर गोळा करणारे सर्वसामान्य शेवगांवकर मेटाकुटीला आले आहेत.

यासाठी माजी जिल्हापरिषद सदस्य श्री चंद्रकांत कर्डक सार वंचीत चे राज्य उपाध्यक्ष श्री किसन चव्हाण सर सम्राट अशोकनगर चे  अध्यक्ष राहूल  सावंत माजी उपनगरध्यक्स्ब वजीरभाई पठाण यांनी व ईतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी  नगरपरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी भुमीअभिलेख { सिटी सर्व्ह }  तहसीलदार शेवगाव यांच्याकडे वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी दाखल केल्या आहेत.

आता जर हा प्रश्न मार्गी  लागला नाही तर मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर मोठे जाण आंदोलन उभारणार  असल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगितले आहे.

ताजा कलम.

अनेक हुशार आणि चाणाक्ष लोकांनी वीस तें तीस लाख रुपयांच्या घराचे बांधकाम करतांना शासनाकडून घरकुलाचे अडीच तें तीन लाख रुपये आपल्या पदरात पडुन घेतले खरे झोपडपट्टी रस्त्याच्या कडेला गावठाणात राहणारे काबाडकष्ट करणारे मोलमजुरी करून  आपले घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना घारकूल देणार कोण ???

*अविनाश देशमुख शेवगांव* 

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !