शाळा व्यवस्थापन समिती ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

शाळा व्यवस्थापन समिती ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये : Free Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi 2024

Table of Contents

शाळा समिती रचना काय काय ? Shala Vyavasthapan Samiti Mahiti

Free Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi : शाळा व्यवस्थापन संकल्पना शाळा व्यवस्थापन ही एक व्यापक संकल्पना आहे. व्यवस्थापनात उ‌द्दिष्टे ठरवून योजना बनवण्याचे कार्य केले जाते. व्यवस्थापनाचा इतिहास प्राचीन असला तरी २० व्या शतकात शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाचा विचार सुरू झाला. व्यवस्थापन प्रभावी होण्यासाठी नियोजन महत्त्वाचे असते.

शाळा, उ‌द्योग, इतर व्यवसाय इत्यादी भरभराटीस आले असतील तर आपण त्याचे शाळा व्यवस्थापन चांगले आहे असे म्हणतो. पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशाच्यावेळी ज्या शाळा, महाविद्यालयाचे शाळा व्यवस्थापन चांगले आहे अशाच ठिकाणी प्रवेशास प्राधान्य देतात.

शाळा व्यवस्थापन समिती सभा विषय Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

तुम्ही तुमच्या शाळेत समिती सभा विषय विविध कार्यक्रमास उपस्थित राहिला असाल. कार्यक्रमात आयोजनामध्ये काही त्रुटी राहिली असेल तर त्या कार्यक्रमाचे शाळा व्यवस्थापन चांगले नव्हते असे आपण सहजच म्हणतो. शाळा व्यवस्थापन समिती सभा विषय चांगले होणे म्हणजे उ‌द्दिष्टांची पूर्ती होणे होय.

तुम्ही तुमच्या शाळेत विविध कार्यक्रमांत सहभाग नोंदवला असेल. आपण आपल्या दैनंदिन जीवनात देखील विविध कार्यक्रम आणि समारंभ साजरे करत असतो.

  • एखादा कार्यक्रम व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता असते ?
  • एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन कसे केले जाते ?
  • कार्यक्रमाचे नियोजन करताना कोणकोणते घटक त्यात सहभागी असतात ?

शाळा व्यवस्थापन म्हणजे काय? Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

  • शाळा व्यवस्थापनामध्ये अनेक व्यक्ती एकत्र येऊन काम करीत असतात. शाळा व्यवस्थापनाची संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी काही तज्ज्ञांच्या व्याख्या अभ्यासू,
  • “शाळा व्यवस्थापन हे एक बहुउद्देशीय साधन असून त्या अन्वये एखादा व्यवसाय, व्यवस्थापक, कामगार आणि कामाचे व्यवस्थापन केले जाते.” पीटर ड्रकर
  • “शाळा व्यवस्थापन म्हणजे व्यक्तीचा विकास होय. व्यवस्थापन म्हणजे व्यक्तीसंदर्भात प्रशासन होय.” – लॉरेन्स ए अॅपली
  • “पूर्वनिर्धारित उ‌द्दिष्टाच्या पूर्ततेसाठी निर्णय घेण्याची तसेच उपक्रमात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याची क्रिया म्हणजे व्यवस्थापन होय,” – स्टॅनले व्हान्स

शाळा व्यवस्थापनाची मूलतत्त्वे Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

शाळा व्यवस्थापन समिती ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये : Free Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi 2024

शाळा व्यवस्थापन समिती ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये : Free Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

व्यवस्थापनाची एकूण १४ मूलतत्त्वे हेन्री फेयॉल यांनी मांडलेली आहेत.

  • (१) कार्यविभाजन
  • (२) अधिकार व जबाबदारी
  • (३) शिस्त
  •  (४) अधिकाऱ्यांमधील एकवाक्यता
  • (५) मार्गदर्शनाची एकलक्ष्य दिशा
  •  (६) वैयक्तिक किंवा सामूहिक फायदधास कमी महत्त्व
  • (७) मोबदला
  • (८) केंद्रीकरणाचे प्रमाण
  •  (९) अधिकार साखळी
  • (१०) क्रम
  • (११) समानता
  • (१२) कर्मचाऱ्याचे दायित्त्व
  • (१३) पुढाकार
  • (१४) संघभावना

शाळा व्यवस्थापनाची मूलतत्त्वे आणि शाळा व्यवस्थापन समिती रचना : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

  • व्यवस्थापन ही संज्ञा उ‌द्योग वा व्यवसायाशी संबंधित आहे. तेथून ती शिक्षणशास्त्रात आली आहे.
  • व्यवस्थापकाद्वारे शिक्षणाच्या क्षेत्रातही व्यवस्था- पनाची संकल्पना लागू केली जाते, त्यास शैक्षणिक व्यवस्थापन असे म्हणतात.
  • दिलेल्या आदेशानुसार काम केले जाते वा नाही यावर व्यवस्थापकाचे नियंत्रण असते.
  • व्यवस्थापनशास्त्र ही एक महत्त्वाची ज्ञानशाखा आहे.
  • सर्वच क्षेत्रात व्यवस्थापन ही आवश्यक बाब बनली आहे.

शाळा  व्यवस्थापनाचा अर्थ व स्वरूप शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

अर्थ

शैक्षणिक उद्दिष्टांप्रत पोहचणे तसेच नियोजनपूर्ण कार्यवाही करण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. भौतिक व मानवी संसाधने, विविध उपक्रम इत्यादींचा शिक्षणात उपयोग करून शैक्षणिक उ‌द्दिष्टे साध्य करण्याच्या हेतूने त्यांचा काळजीपूर्वक वापर करणे म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन होय.

स्वरूप

प्रशासनाने ठरवून दिलेली उद्दिष्टे व्यवस्थापनामार्फत पूर्ण केली जातात. व्यवस्थापनातील विविध कार्य ही परस्परसंबंधी व परस्परपूरक असतात. व्यवस्थापन ही एक एकात्मिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत अधिकाराची एक व्यवस्था अंतर्भूत असते. शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विद्यार्थी, वेळ, अध्यापन, श्रम, साधनसामग्री, अनुदान, विविध उपक्रम यांचे नियोजन, संघटन आणि नियंत्रण केले जाते व प्रत्येक घटकाचा त्याच्या कार्यक्षमतेनुसार उपयोग करून घेतला जातो. आधुनिक काळात व्यवस्थापनाची आवश्यकता सर्वच क्षेत्रांत बाटू लागली आहे. व्यवस्थापनाची तत्त्वे शिक्षण क्षेत्रात सुद्धा लागू केली जातात. शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये नियोजन, संघटन, संचालन, अभिप्रेरण, नेतृत्व, संदेशवहन, निर्णय, नियंत्रण इत्यादी घटकांचा समावेश होतो.

शैक्षणिक व्यवस्थापन

वरीलप्रमाणे आपण व्यवस्थापनाची संकल्पना अभ्यासली. व्यवस्थापनाची संकल्पना ज्या वेळी शिक्षण क्षेत्रास लागू होते तेव्हा त्यास शैक्षणिक व्यवस्थापन असे म्हणतात. शैक्षणिक क्षेत्रात देखील व्यवस्थापन आवश्यक ठरते. शिक्षणाच्या माध्यमातून देशाचा जबाबदार नागरिक घडवला जातो. शालेय उपक्रम, भौतिक साधन संपत्ती व मूल्यमापन यांचा समावेश शैक्षणिक व्यवस्थापनात होतो.

हेही वाचा :

शैक्षणिक व्यवस्थापनाची उद्दिष्टे : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

  • शैक्षणिक संस्थेच्या कार्याचे धोरण निश्चित करणे. मानवी घटकात योग्य आंतरसंबंध विकसित करणे.
  •  शैक्षणिक व्यवस्थापनातील प्रत्येक घटकाला योग्य प्रेरणा देणे.
  • नियोजित काम वेळेत पूर्ण करणे, संस्थेचा कारभार योग्यरीत्या चालवणे व कामाची विभागणी करणे.
  • उपलब्ध भौतिक घटकांचे नियोजन करणे.
  • संस्थांच्या उद्दिष्टांची पूर्तता करणे.
  • शैक्षणिक व्यवस्थापनाची गरज आणि महत्त्व

शाळा व्यवस्थापन समिती कामकाज गरज : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

  • शिक्षण प्रणालीतील संरचनांची माहिती करून घेण्यासाठी.
  • सहकार्य, गटाची एकात्मता, विशाल दृष्टिकोन इत्यादी गुणांचा विकास करण्यासाठी.
  • शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी.
  • संस्थेचे प्रशासन व संस्थेतील इतर कर्मचारी
  • यांच्यातील संघर्षाचे व्यवस्थापन करण्यासाठी.
  • शिक्षणाची ध्येये व त्याच्या पूर्ततेसाठी.
  • वैयक्तिक अधिकार व कर्तव्याची अंमलबजावणी करण्यासाठी.

महत्त्व

  • शिक्षणाची ध्येये, धोरणे, निश्चित करून मानवी व भौतिक संसाधनांचे व उपक्रमांचे नियोजन करता येते.
  • यामुळे शैक्षणिक संस्थेस आर्थिक व भौतिक सुविधा प्रविल्या जातात व त्याची निगा राखण्याची जाणीव निर्माण केली जाते.
  • मानवी घटकांची निवड, नियुक्ती व विकास यांसाठी उपयुक्त ठरते.
  • अध्ययन, अध्यापन पद्धती, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्यापन विषय, वेळापत्रक, अभ्यासपूरक उपक्रम, मूल्यमापन इत्यादींमध्ये योग्य त्या सुधारणा सुचवता येतात.
  • प्रत्येक विद्यार्थ्याला अध्ययनाची योग्य संधी उपलब्ध करून देऊन प्रोत्साहन देता येते.
  • समाज व इतर बाह्य यंत्रणांशी सलोख्याचे संबंध ( प्रस्थापित करून ते टिकवण्यास मदत होते.

शैक्षणिक व्यवस्थापनाची कार्ये : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

  • (१) नियोजन
  • (२) संघटन
  • (३) समन्वय
  • (४) दिग्दर्शन
  • (५) संप्रेषण
  • (६) निर्णय प्रक्रिया
  • (७) कार्यप्रेरण
  • (८) नियंत्रण
  • (९) साधनांची जुळवाजुळव व त्याचा एकात्म उपयोग
  • (१०) कार्यवाही
  • (११) मूल्यमापन

शाळा व्यवस्थापनाची कार्य : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

  • (१) नियोजन (Planning): शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्टे, शैक्षणिक धोरणे, कार्यक्रम आणि पद्धती साध्य करायचे मार्ग व साधने ठरवणे याचा समावेश शैक्षणिक नियोजनात होतो.
  • (२) संघटन (Organisation): शिक्षण प्रक्रियेतील समाविष्ट मानवी घटकांची भूमिका निश्चित करणे व त्यांच्या परस्पर आंतरसंबंधाच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही करणे म्हणजेच संघटन होय.
  • (३) समन्वय (Co-ordination): शैक्षणिक कार्याच्या बाबतीत एकमेकांच्या अधिकार मर्यादा आखून देणे, तसेच कामाच्या मर्यादा निश्चित करून त्याचा एकमेकांशी संबंध साधणे. उदा. मुख्याध्यापक व शिक्षक.
  • (४) दिग्दर्शन (Direction) कर्मचाऱ्यास काम समजावून सांगणे, आदेश व सूचना देणे, चर्चा करणे, निरीक्षण करणे इ. चा समावेश दिग्दर्शनात होतो.
  • (५) संप्रेषण (Communication): दोन किंवा अधिक व्यक्तींमधील होणाऱ्या शैक्षणिक कल्पना, विचार वस्तुस्थितीची मते, भावना यांच्या देवाणघेवाणीस संप्रेषण असे म्हणतात.
  • ६) निर्णय प्रक्रिया (Decision Making) : जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त पर्यायांमधून एकाच पर्यायाची निवड काही विशिष्ट निकषाच्या आधारे करायची असते तेव्हा त्या प्रक्रियेस निर्णय प्रक्रिया असे म्हणतात.
  • (७) कार्यप्रेरण (Motivation): कोणतेही काम करण्यासाठी इच्छा व उत्साह निर्माण करणे यालाच कार्यप्रेरण असे म्हणतात.
  • (८) नियंत्रण (Control): नियंत्रण या संकल्पनेमध्ये प्रत्यक्ष झालेले काम निश्चित करणे, व त्या कामाचे मूल्यमापन करणे आणि योजनेप्रमाणे निष्पत्ती होण्यासाठी गरजेनुसार सुधारणात्मक उपाययोजना सुचवणे या तीन बाबींचा समावेश होतो.
  • (९) साधनांची जुळवाजुळव व त्याचा एकात्म उपयोग (Adjustment of resources and their integrative use) यामध्ये भौतिक व मानवी साधनसामग्रीच्या जुळवाजुळवीसाठी व मानवी संसाधनांच्या विकासासाठी कराव्या लागणाऱ्या एकात्म प्रयोगाचा समावेश होतो.
  • (१०) कार्यवाही (Implementation): निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार कामाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक सर्वच कृतींचा समावेश कार्यवाहीमध्ये होतो.
  • (११) मूल्यमापन (Evaluation): मूल्यमापन ही उद्दिष्टांचे संपादन मोजण्याची आणि मूल्यांकनाची प्रक्रिया आहे. त्यामुळे बलस्थाने आणि कमकुवतपणा यांबाबतची अंतर्दृष्टी मिळते. तसेच शैक्षणिक व्यवस्थापनात सुधारणा होण्यासाठी मदत होते.

शाळा व्यवस्थापन समिती ठराव नमुना करून पहा : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

  • इंटरनेटचा वापर करून शाळा  व्यवस्थापनाच्या विविध व्याख्या संकलित करा.
  • शाळेतील मुख्याध्यापकांची भेट घेऊन त्यांच्याकडून शैक्षणिक व्यवस्थापनाच्या विविध पैलूंची माहिती घ्या.

शाळा  प्रशासन शाळा व्यवस्थापन समिती ठराव नमुना : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

आपल्या दैनंदिन जीवनात व्यवस्थापन आणि प्रशासन हे दोन शब्द नेहमीच आपल्या कानावर पडतात. व्यवस्थापन आणि प्रशासन या दोन भिन्न संज्ञा आहेत. प्रशासन ही संज्ञा शासन यंत्रणेतून आली आहे. प्रशासनामध्ये कार्यव्यवस्थेचा कारभार पाहणे अभिप्रेत आहे. प्रशासन हे कोणतेही कार्य प्रत्यक्ष कार्यवाहीत आणण्यासाठीची तयार केलेली एक यंत्रणा आहे. धोरणाची अंमलबजावणी करण्याचे कार्य ही यंत्रणा करते. प्रशासक योजनाची अंमलबजावणी करत असतो व इतरांकडून योजनांची पूर्तता करून घेत असतो.

राष्ट्र विविध प्रकारच्या प्रशासन प्रणालीचा स्वीकार करत असते. उदा., केंद्रित प्रशासन, विकेंद्रित प्रशासन, संमिश्र स्वरूपाचे प्रशासन अशा प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून शासनाच्या विविध धोरणांची व कार्यक्रमांची विभागणी केली जाते. नियोजन हा प्रशासनाचा गाभा आहे. प्रशासनामध्ये ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच कार्य केले जाते. कोणत्याही कार्याचे व्यवस्थापन आणि संघटन झाल्यानंतर प्रशासन कार्य सुरू होते.

प्रशासनामध्ये प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जातो. धोरण निश्चिती, समन्वय, वित्त व्यवस्था, कार्यनिष्पत्ती, संघटन निर्मिती व नियंत्रण इत्यादी बाबींचा शैक्षणिक प्रशासनात समावेश होतो.

शाळा प्रशासनाचे स्वरूप : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

  • शैक्षणिक प्रशासनात नियोजन करणे, संघटन करणे, दिग्दर्शन करणे, समन्वय साधणे आणि मूल्यमापन करणे या प्रक्रियांचा समावेश होतो.
  • नफा मिळवणे हे शैक्षणिक प्रशासनाचे उद्दिष्ट नसते.
  • शैक्षणिक प्रशासन हे सर्व प्रकारच्या शिक्षणात असते.
  • शैक्षणिक प्रशासन हे काही बाबींसंदर्भात सामान्य प्रशासनाप्रमाणेच असते तर काही बाबतींत सामान्य प्रशासनापेक्षा भिन्न असते.
  • शैक्षणिक प्रशासन हे शिक्षणाच्या विविध स्तरांवर केले जाते. यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण इत्यादी स्तरांचा समावेश होतो.
  • प्रशासन ही संकल्पना समजून घेण्यासाठी पुढील व्याख्या अभ्यासू,
  • “प्रशासन म्हणजे नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे, समन्वय करणे व नियंत्रण करणे होय.” – फेयॉल
  • प्रशासन म्हणजे व्यवस्थापनाशी संबंधित सर्व बाबींची काळजी घेणे.
  • नियोजनानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करणे म्हणजे प्रशासन होय.

शाळा प्रशासनाचा अर्थ : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

जगातील प्रत्येक राष्ट्र आपल्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक बाबींचा विचार करून शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्टे ठरवत असते. ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निश्चित अशी प्रशासकीय प्रणाली निर्माण केली जाते. तसेच आपापल्या आवश्यकतेनुसार प्रत्येक  शैक्षणिक प्रशासन हे शिक्षणाच्या सर्व प्रकारांत केले जाते. यामध्ये औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, सामान्य शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, विशेष शिक्षण, शिक्षक शिक्षण, एकात्मिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण इत्यादी.

शैक्षणिक प्रशासन हे विविध टप्प्यांवर करण्यात येते. यामध्ये केंद्रिय स्तरावरील प्रशासन, राज्य स्तरावरील प्रशासन, जिल्हा स्तरावरील प्रशासन, गट स्तरावरील प्रशासन आणि संस्थात्मक स्तरावरील प्रशासन यांचा अंतर्भाव होतो.

शैक्षणिक प्रशासनाची उद्दिष्टे : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

  • विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण पुरवणे.
  • सर्व संसाधनांचा पुरेपूर व योग्य वापर करणे.
  • शिक्षकांची व्यावसायिक नीतितत्त्वे आणि व्यावसायिक विकास निश्चित करणे.
  • लोकशाहीस पूरक शालेय उपक्रम राबवणे.
  • समाजामध्ये गतिमानता आणणे.
  • सहशालेय उपक्रम व गुणत्तावृद्धीसाठी उपक्रम राबवणे.
  • काम वेळेत पूर्ण करणे.
  • विद्यार्थ्यांना जीवन जगण्यास सक्षम बनवणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन रुजवणे तसेच जीवनातील सर्व बाबींत वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विकसित करणे.
  • शिक्षणातील गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे.

शाळा प्रशासनाची गरज आणि महत्त्व : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

शिक्षण ही अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक कालखंडामध्ये शिक्षण प्रक्रियेमध्ये कालानुक्रमे बदल घडून येत असतात. काळानुसार शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये कोण- कोणते बदल घडवून आणावेत? केव्हा, कसे, कोणी व कोठे बदल करावेत ? समाजसुधारणा व समाजप्रगती हया उ‌द्दिष्टपूर्तीकरिता शिक्षणाने कोणती भूमिका पार पाडावी या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी शैक्षणिक प्रशासनाची आवश्यकता असते.

शाळा प्रशासनाची कार्ये  शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

  • समन्वय
  • संघटन
  • शैक्षणिक
  • प्रशासनाची कार्य,
  • अधिकार निश्चिती
  • कामाचे विभाजन
  • योजनांची प्रत्यक्ष
  • मार्गदर्शन
  • कार्यवाही

शैक्षणिक प्रशासनाची कार्ये : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा व तालुकास्तरीय शैक्षणिक प्रशासन १ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १३ मार्च १९६२ या दिवसापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा कायदा संमत करण्यात आला. त्यानुसार १ मे १९६२ पासून महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य संस्थांच्या कारभारास सुरुवात झाली. या कायदयानुसार जिल्हा हा प्रशासनाचा प्रमुख घटक मानण्यात आला. पोलीस व न्याय ही खाती वगळून इतर सर्व खात्यांच्या प्रशासनाची जबाबदारी जिल्हा परिषदांवर सोपवण्यात आली. यानुसार शिक्षण, बांधकाम, आरोग्य, सहकार, उद्योग, कृषी, अर्थ, समाजकल्याण या खात्यांचा कारभार जिल्हा परिषदांकडे आला.

शहरांमधील प्राचीन काळामध्ये शाळा गुरुकुलामध्ये म्हणजेच गुरुगृही, आश्रमामध्ये भरत असत. त्यामुळे शिक्षणाची ध्येय धोरणे ठरवण्यापासून ते राबवण्यापर्यंत सर्वच अधिकार ऋषीमुनी यांच्याकडे होते. स्वातंत्र्योत्तर काळात आपण लोकशाहीचा स्वीकार केल्यामुळे शिक्षणाची ध्येय धोरणे ठरवण्यापासून ते शिक्षण प्रत्यक्ष राबवण्यापर्यंतचे सर्व अधिकार राज्यकर्त्यांकडे आले आहेत.

लोकशाहीमध्ये विविध बौद्धिक व वैचारिक कार्यासाठी प्रशासनाची गरज निर्माण झाली. उदा., खासगी व सरकारी संस्थांचा कारभार कसा चालवावा. शैक्षणिक विकासासाठी कोणकोणते कार्यक्रम राबवावेत. कोणत्या कार्यासाठी मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे यासारख्या विविध बाबींसाठी शैक्षणिक प्रशासन गरजेचे वाटायला लागले. थोडक्यात, ‘गतिमान शैक्षणिक बदलाच्या अनुषंगाने लोकशाहीला उपयुक्त नागरिक तयार करण्यासाठी आणि शैक्षणिक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी शैक्षणिक प्रशासनाची गरज आहे.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवड : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवड  कारभाराजल्हा पास्पदाकड आला. शहरा मधालशिक्षणाचा जबाबदारी ही नगरपालिका व महानगरपालिका यांच्यावर सोपवण्यात आली. त्यामुळे समिती अध्यक्ष निवड शिक्षणाच्या क्षेत्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्त्व प्राप्त झाले.

जिल्हा परिषदांकडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची समिती अध्यक्ष निवड ची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे नियंत्रण प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या समिती अध्यक्ष मार्फत करण्यात येते. जिल्हास्तरीय शैक्षणिक प्रशासनाची संरचना पुढील पानावर दिलेली आहे.

 शाळा व्यवस्थापन समिती ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

शाळा व्यवस्थापन समिती ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) : Shala Vyavasthapan Samiti Mahiti In Marathi

प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी, जिल्ह्यातील शिक्षणविषयक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली असते. जिल्ह्यातील शिक्षणविषयक व्यवस्थापन व प्रशासनाच्या खालील जबाबदाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांना पार पाडाव्या लागतात.

Important Links : 

Related Notification Information Pdf : Click Here
Official Website Information Link :  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !