पोलीसांची ‘थर्ड डिग्री’ म्हणजे काय? / Third Degree in Police Investigation

Third degree in police investigation ? : पोलीसांची ‘थर्ड डिग्री’ म्हणजे काय? प्रकार असतो? तो आता सुद्धा अस्तित्त्वात आहे का? बातमी जुनी असून कायदा आहे म्हणून बातमी लावण्यात आली आहे.

Third degree in police investigation ?
Third degree in police investigation ?

महाराष्ट्र राज्यच्या सांगलीतील अनिकेत कोथळे या तरुणाच्या पोलिस कोठडीतील मृत्यूने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याने पोलिस तपासाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले.  ‘third degree’ गंभीर ज्वलंत प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला.थर्ड डिग्रीच्या या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.पोलीसांची

‘थर्ड डिग्री’ म्हणजे काय? : Third Degree in Police Investigation

पोलिस तपास म्हणजे फक्त मारहाणच का ? वा त्याशिवाय त्यांना तपासच करता येत नाही का ? तसेच हा अधिकार त्यांना कोणी दिला,हा सर्वात प्रथम व महत्त्वाचा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात यानिमित्ताने पुन्हा घोळू लागला आहे .एखाद्या गुन्ह्यातील संशयिताला शिक्षा देण्याचा अधिकार हा त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाला आहे. तसेच ही शिक्षा म्हणजे मारहाण वा थर्ड डिग्री नसते.

आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे भरभक्कम पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांचे असते. या पुराव्याच्या आधारे न्यायालयात आरोपीनेच गुन्हा केला आहे हे सिद्ध व्हावे लागते. आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार न्यायालयास असतो.

कोणताही निर्ढावलेला आरोपी हसतखेळत आपल्या गुन्ह्याची कबुली देत नाही. केलेल्या गुन्ह्याचा तपशील सांगत नाही. गुन्ह्यासाठी वापरलेली शस्त्रे, हत्यारे स्वतःहून पोलिसांना काढून देत नाही किंवा चोरी-दरोड्याचा मुद्देमाल काढून देत नाही.

त्यामुळे गुन्ह्याचा तपास करणे आणि भरभक्कम पुरावे गोळा करणे हे आव्हानात्मक काम असते त्यासाठी तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला त्या विषयाचा अभ्यास असावा लागतो. Cyber Crime सारख्या नव्याने येणाऱ्या विषयांचे प्रशिक्षण घ्यावे लागते.

तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे खबरी नेटवर्क भक्कम असावे लागते आरोपी व साक्षीदारांना बोलते करून तपासाला चालना देणारी माहिती गोळा करण्याचे कौशल्य असावे लागते. आरोपीच्या मनात भीती-दहशत निर्माण करून माहिती मिळविण्यासाठी हुशार अधिकारी प्रत्यक्ष मारहाणीपेक्षा आपल्या जबर मारहाण होईल अशी भीती आरोपीच्या मनात निर्माण करूनही आपले उद्घिष्ट साध्य करतात.

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, माराच्या भीतीने गुन्ह्यात गोवले गेलेले निष्पापही गुन्ह्याची कबुली देतात. त्यामुळेच अशा पद्धतीने केलेला तपास पुढे न्यायालयात टिकत नाही. थर्ड डिग्री वापरून आरोपीचा पोलसांनी मिळवलेला कबुलीजवाब अनेकदा कोर्टात टिकत नाही . आरोपी कबुलीजबाब फिरवतात .बहुतांश त्याआरोपींची तेथे निर्दोष मुक्तता होते.

त्याला इतर कारणेही आहेत. ती देखील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका घेणारी आहेत.काही प्रकरणांतील तपासात मुद्दाम कच्चे दुवे ठेवले जातात. त्यासाठी लाच घेतली जात असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून उघडही झाले आहे.

दुसरीकडे श्रीमंत आरोपींची ,मात्र पोलिस बडदास्त ठेवतात. त्यातही राजकीय वरदहस्त असलेल्या आरोपींना,मात्र हात लावण्याची त्यांची ताकद नसते.तेथे ‘third degree’ चा विचार त्यांच्या मनाला शिवतही नाही.मात्र एखाद्या गरिबाने आवाज उठविला, तर पोलिस लगेच त्याला आपला हिसका दाखवितात.

पोलिसांचा बहुतांश तपास हा थर्ड डिग्रीनेच चालतो.तो कधीकधी नंतर सीआयडी व नंतर सीबीआयच्या उघडा पडतो. सदर गुन्ह्यातील आरोपी दुसरेच निघतात. दरम्यान, अशा प्रकरणात गोवल्या गेलेल्यांची आयुष्य उध्वस्त झालेले असते. दुसरीकडे त्याला जबाबदार असलेल्या पोलिस व त्यांच्या खात्याविरुद्ध फारशी कारवाई होत नाही.

कस्टडी डेथमध्ये महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्य देशात अव्वल आहे, ही शरमेची गोष्ट आहे. सर्वाधिक कोठडी मृत्यू हे दरवर्षी हे आपल्या राज्यात होत आहेत. 2013 ते 2015 या तीन वर्षात 308 मृत्यू निव्वळ पोलिस कोठडीत झाले. त्यातील सर्वाधिक 75 हे महाराष्ट्रातील आहेत.

 

Third degree in police investigation ?
Third degree in police investigation ?
पोलीसांची ‘थर्ड डिग्री’ म्हणजे काय?

बनावट चकमकीचा शिक्का बसलेले दोन नंबरवर आहे.ही National Crime हा रेकॉर्ड ब्यूरोची आकडेवारी आहे.मानवाधिकार संस्था व संघटनांचा आकडा हा यापेक्षा मोठा आहे.मागास बिहारपेक्षाही प्रगत महाराष्ट्र कस्टडी डेथमध्ये आघाडीवर आहे.

तसेच ते पोलिस कोठडीच हे मृत्यू नाही,तर न्यायालयीन कोठडीतही होत आहेत. Mumbai आर्थर रोड कारागृहात अति छळामुळे झालेला महिला बंदिवानाचा मृत्यू हे ताजे उदाहरण आहे.म्हणजे दोन्ही कोठड्या सुरक्षित नाहीत. त्यातही आरोप सिद्ध होण्यापूर्वीच पोलिस कोठडीत होत असलेली मारहाण व मृत्यू हे मानवाधिकार उल्लंघनाचे मोठे उदाहरण आहे.

आजच्या डिजिटल, विज्ञान युगात माणसाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणेच सामर्थ्य कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडे आहे. मोबाईल, संगणक, जीवशास्त्रीय चाचण्या, मानसिक चाचण्या असा विविध साधनांच्या मदतीने गुन्हे अन्वेषणालाही मोठी चालना मिळाली आहे.

त्यामुळे आरोपीला बेदम मारहाण करण्याची मध्ययुगीन पद्धत पोलिसांनी सोडून द्यायला हवी. पोलिस कोठडीतील मृत्यूवरून दोषी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत. Third degree in police investigation ?

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Third degree in police investigation ? pdf येथे क्लिक करा 
Third degree in police investigation ? Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !