महसूल व वनविभागाच्या वतीने विविध शासकीय दाखल्यांचे वाटप :

महसूल व वनविभागाच्या वतीने विविध शासकीय दाखल्यांचे वाटत 

महसूल व वनविभागाच्या वतीने विविध शासकीय दाखल्यांचे वाटत 

महसूल पंधरवडा:- महसूल व वनविभागाच्या वतीने विविध शासकीय दाखल्यांचे वाटप

प्रतिनिधी, चोपडा

जळगाव: दि.‌९ ऑगस्ट २०२४ रोजी, तालुक्यातील विरवाडे येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालय विरवाडे येथे तहसील कार्यालय चोपडा मौजे विरवाडे, आडगाव व महसूल व वनविभागाच्या सौजन्याने विविध प्रकारचे दाखले वाटप व मार्गदर्शन शिबिर (महसूल इ प्रणाली) राबवण्यात आले व महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने गावातील ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री.महादेवजी खेडकर (प्रांत अधिकारी अमळनेर,विभाग अमळनेर) यांनी भूषवले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा तहसीलदार श्री.भाऊसाहेब थोरात, चोपडा नायब तहसीलदार श्री. आर.आर.महाजन विद्याभारती बहुउद्देशीय शिक्षण मंडळाचे अध्यक्षश्री.पंडितदादा चिंधु कोळी, विद्याभारती बहुउद्देशीय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापतीश्री.आत्माराम भाऊ गोरख माळके,

विविध कार्यकारी सोसायटी विरवाडे चे चेअरमन श्री.भरत बद्धु राजपूत, मंडळ अधिकारी श्री.यु.पी पाटील, गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री.विशालजी आत्माराम माळके, स्वस्त धान्य दुकानदार विरवाडे परवानाधारक श्री.निंबा वेडू कोळी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस.एल.पाटील, श्रीमती.दिपाली ईशी तलाठी विरवाडे, मंडळातील इतर सर्व तलाठी बंधू भगिनी तसेच गावातील विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी व गावकरी बंधू भगिनी व लाभार्थी विद्यालयात उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी उपस्थीत सर्व पाहुण्यांचे विद्यालयात गुलाब पुष्प शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मोलाचे मार्गदर्शन चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात साहेब यांनी केले.

हेही वाचा :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !