माणुसकी जपणारा अवलिया डॉ. रणजित पावरा : Dr. Ranjit Pawara Who Preserves Humanity

Dr. Ranjit Pawara Who Preserves Humanity : माणुसकी जपणारा अवलिया डॉ. रणजित पावरा MD gynecologist वेळ तशी नेहमीचीच दुपारची मला ही तसे फारसे काही काम नव्हते मी ही त्याच परिचित रस्त्याने जात होतो एरवी मी सहसा त्या रस्त्याने जात नाही पन पेट्रोल कमी असल्याने व गाडीत पेट्रोल भरण्यासाठी शॉर्टकट मारीत मी जात होतो.. त्यावेळेस सहज *मातोश्री हॉस्पिटल शिरपूर येथे गर्दी पाहून तसेच माझ्या ओळखीचे लोक पाहून मी गाडीला जरा ब्रेक मारीत थांबलो.. व सहज हॉस्पिटल मध्ये शिरलो.. तसा मी या हॉस्पिटल ला नेहमीच अधूनमधून येत जा असतोच म्हणा.. पन आज जरा मुद्दाम च थांबलो.. डॉ. साहेबांच्या केबिन मध्ये गर्दी ही नेहमीचीच.. हॉस्पिटल म्हटले म्हणजे गर्दी ही आलीच.. मी ही हॉस्पिटल मध्ये काम करत असल्याने मलाही तशी गर्दीची सवय झाली आहे..

माझ्या परिचित माणसांशी बोलून झाल्यावर *मी घरी निघत असताना मला माझ्या घराजवळील (या अगोदर फार पूर्वी ते माझ्या घरासमोर जागली करत होते असे जोडपे दिसलें)काही ओळखीची कायम परिचित अशी माझी माणसे भेटली* त्यांच्या बोलण्याच्या गडबडीत मला असे लक्षात आले की त्यांच्या मुलीची डिलीव्हरी या हॉस्पिटल ला झाली होती व आज डिस्चार्ज करून ते परत जात होते.. *सर्व हॉस्पिटल ची आजची परिस्थिती पहिली तर डिस्चार्ज वेळी बिलाच्या भीतीने चांगल्या चांगल्या लोंकाची बोबडीच वळते… व बिल पाहून तर श्वासच थांबायचा बाकी राहतो असो* तसेच मानसिक टेन्शन त्यांच्याही चेहऱ्यावर मला दिसलें..

मी शांतपणे त्यांना बिल पावती काउंटर वर मागवून पहिली बिल हे माझ्या अपेक्षा पेक्षा कितीतरी पटीने कमी होते.. 03 दिवस delux रूम मध्ये असून देखील बिल हे फक्त 13000/- एवढेच होते.. मी त्या माझ्या परिचित lonkana म्हटले अहो बिल खूप कमी आहे भरून टाका.. परंतु त्यांच्याकडे फक्त 10500/- रुपये एवढेच होते.. त्यांनी काउंटर वर तसे बोलून दाखविले होते.. पन काउन्टरवरील कर्मचारी हेही हतबल होते

त्यांनी सांगितले की बिल कमी आहे शेवटी आपन डॉ. साहेब यांच्याशी बोलून घ्या.. 10 मिन. थांबून मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला व थोडे बिल कमी होते का..? किंवा नंतर पेड करता येईल का असे विचारणेसाठी केबिन मध्ये परवानगी घेऊन प्रवेश केला… *फक्त an फक्त 30 ते 34 वर्षाच्या आतील डॉ. साहेब यांनी हसून आमचे स्वागत केले.. अन सर्वात अगोदर पेशन्ट ला घरी गेल्यावर काय काळजी घ्यावी असे मायेने सांगितले..( Dr. Ranjit Pawara Who Preserves Humanity )

मी येथे सांगायचे विसरलो की जे स्त्री रुग्ण होते ते जन्मापासून मुके होते.. त्यांच्या(डॉ साहेब)बोलण्यात इतका साधेपणा व आपलेपणा होता की. समोरील पेशंट चे नातेवाईक व मी सुद्धा पहातच राहिलो.. मी काही सांगणार बिल कमी संदर्भात तर डॉ. रणजित दादा यांनी पेशंट च्या नातेवाईक यांच्याकडे पाहून सहज विचारले बिलाचा कागद दाखवा व त्या बिलावर 13000/- ऐवजी फक्त अन फक्त 6000/- रुपये केले..* रुग्णाच्या नातेवाईकांना व मला फार फार तर फक्त 500 kiva 1000/- कमी करण्याची अपेक्षा होती.. पन हे तर…

ज्या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये फक्त ऍडमिट चे एवढे बिल येते.. व डिस्चार्ज देते वेळी 50 ते 60 हजार उकळेल जातात* त्या ठिकाणी या *मातोश्री हॉस्पिटल चे तेथील माणुसकी दाखविणाऱ्या डॉ..* चे कुठल्या भावनेने आभार मानावे हेच कळत नव्हते.. पेशंट च्या नातेवाईक व मला तर देवच भेटल्यासारखा झाला.. पेशंट च्या नातेवाईक यांनी 10000/- बिल भरण्याची मानसिकता दाखविली होती परंतु डॉ रणजित दादा यांनी माझ्या बहिणीला माझ्याकडून गिफ्ट असे सांगत स्मित हास्य करून ओ टी मध्ये दुसऱ्या पेशंट ची सेवा करण्यास निघून गेले.. *त्यांच्या पाठमोऱ्या कृतिकडे मी नतमस्तक होत पहातच राहिलो.*. *आज खरे देवदर्शन घडले होते. ( Dr. Ranjit Pawara Who Preserves Humanity ) लेखक परिचित सामाजिक सेवक आहेत.!

Dr. Ranjit Pawara Who Preserves Humanity
Dr. Ranjit Pawara Who Preserves Humanity

शिरपूर येथे महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (MADA) कार्यकारणीची बैठक संपन्न.! Shirpur Adivasi Doctor Association

Dr. Ranjit Pawara Who Preserves Humanity

Shirpur Taluka Dr. Vaishali Pawara MBBS पदवी संपादन.! |

Dr. Aakash Padavi | डॉ. आकाश पाडवी यांचा गावकर्यांमार्फत सत्कार.

Dr. Savita Bhimrao Ambedkar : त्यागमूर्ती डॉ. माईसाहेब आंबेडकर !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !