आरे-वारे समुद्रात चौघेजण बुडाले एकाचा मृत्यू, तिघांना वाचविण्यात ग्रामस्थांना आले यश : Four People Drowned in Aare Vare Sea, one died, the villagers managed to save the three

आरे-वारे समुद्रात चौघेजण बुडाले एकाचा मृत्यू, तिघांना वाचविण्यात ग्रामस्थांना आले यश : Four People Drowned in Aare Vare Sea, one died, the villagers managed to save the three

आरे-वारे समुद्रात चौघेजण बुडाले एकाचा मृत्यू, तिघांना वाचविण्यात ग्रामस्थांना आले यश : Four People Drowned in Aare Vare Sea, one died, the villagers managed to save the 3

आरे-वारे समुद्रात चौघेजण बुडाले एकाचा मृत्यू, तिघांना वाचविण्यात ग्रामस्थांना आले यश : Four People Drowned in Aare Vare Sea, one died, the villagers managed to save the three

रत्नागिरी : तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी मौजमजा करताना रत्नागिरीतील गाडेकर कुटुंबीयातील चौघेजण समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६:३० वाजता घडली. यामध्ये तिघांना वाचवण्यात स्थानिकांसह नातेवाइकांना यश आले असून, पंकज रामा गाडेकर (३३, रा. पुणे, मूळ कारवांचीवाडी रत्नागिरी) यांचा बुडून मृत्यू झाला.

नोकरीनिमित्त पुणे येथे स्थायिक असलेले पंकज रामा गाडेकर हे पत्नी मयुरी गाडेकर यांच्यासह रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील आपल्या गावी सुट्टीसाठी आले होते. गाडेकर कुटुंब रविवारी दुपारी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर गणपतीपुळे येथील समुद्र किनार्यावर समुद्री स्नानासाठी न जाता

• समुद्राच्या लाटेसोबत खेचले गेले खोल पाण्यात. Four People Drowned in Aare Vare Sea

१०८ रुग्णवाहिका पोहोचण्यास लागला तासभर. : Four People Drowned in Aare Vare Sea

गाडेकर कुटुंबीय आरे वारे समुद्रकिनारी आले. गाडेकर कुटुंबातील पंकज रामा गाडेकर, मयुरी पंकज गाडेकर, बालाजी रामा गाडेकर व त्यांचा एक भाचा असे चौघेजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते. कमी पाण्यात मौजमजा सुरू असतानाच अचानक आलेल्या लाटेने पंकज गाडेकर लाटेबरोबर आत ओढले गेले.

लाटे बरोबर ते आत जात असल्याचे लक्षात येताच त्यांची पत्नी मयुरी व भाऊ बालाजी हे त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेले. मात्र, तेही पाण्यात बुडू लागताच किनाऱ्यावर असलेल्या मुले, महिलांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत चौघांनाही पाण्याबाहेर काढले. परंतु, पंकज गाडेकर हे खोल पाण्यात बुडासल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

स्थानिकांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क केला. परंतु, १०८ रुग्णवाहिका तासाभराने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर चौघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालय आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पंकज रामा गाडेकर यांना मृत घोषित करण्यात आले. Four People Drowned in Aare Vare Sea

ही माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस अंमलदार जोशी, शिवगण यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर रात्री उशिरा आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा :

दिव्यांगांनी लुटला आरे-वारे येथील झिपलाइनचा आनंद Four People Drowned in Aare Vare Sea

रत्नागिरी: मुंबईतून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या दिव्यांगांनी आरे-वारे येथील झिपलाइनचा आनंद घेतला. रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन (आरएचपी) आणि ओशन फ्लाय झिपलाइनच्या गणेश चौघुले यांच्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. प्रथमच दिव्यांगांना झिपलाइनचा अनुभव घेता आला.

पूजा चौधरी आणि नफीस अजिज वाघू हे रत्नागिरीत पर्यटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावरील झिपलाइन पाहिली. त्यांनी त्याचा आनंद घेण्याचे ठरविले. आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, समीर नाकाडे यांनी यासाठी सहकार्य केले. आरे-वारे समुद्रकिनारा दाखवत असताना त्यांनी झिपलाइन पाहिले.

त्यावेळी ‘ओशन फ्लाय झिपलाइन’चे गणेश चौघुले व सहकाऱ्यांनी झिपलाइनबाबत माहिती सांगितली. त्यानंतर पूजा चौधरी आणि नफीस वाघू यांनी झिपलाइनचा आनंद घेतला.

दिव्यांगांची कोकण सफर यशस्वी करण्यासाठी ‘ओशन फ्लाय रत्नागिरी गणपतीपुळे सागरी महामार्गावरील आरे-वारे येथे दिव्यांग बांधवांनी झिपलाइनचा आनंद लुटला. टकत समुद्र पाहण्याचा आनंद वेगळाच पूजा चौधरी (२२, रा. कहेर, गुजरात) हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. पूजा रेल्वेतून पडल्याने गुडघ्याखाली दोन्ही पाय काढावे लागले.

पूजा तेव्हापासून व्हीलचेअरवर आहे. आरे-वारे येथील डोंगरातून दोरीला सुरक्षित लटकत समुद्र पाहत जाण्याचा आनंद काही वेगळाच आहे, असे पूजाने सांगितले. झिपलाइन’चे प्रमुख गणेश चौघुले, सुजित मयेकर, रंजित मालगुंडकर, समुद्रावरून सफर करताना मजा आली नफीस अजिज वाघू (५२, रा. मुंब्रा) एका कंपनीत टेक्निशियन म्हणून सुरुवातीला मुंबई व नंतर सौदी अरेबियात काम करत होते.

२००६ साली पाचव्या मजल्यावर लिफ्ट जोडताना अपघात होऊन खाली कोसळले. मणक्याला मार लागल्याने कमरेपासून खालील भागाच्या संवेदना गेल्याने ‘पॅराप्लेजिक’ झाले. ते व्हीलचेअरवर वावरत असले तरी इंटेरियर डेकोरेटर म्हणून काम पाहतात. रोप-वेने समुद्रावरून सफर करताना खूप मजा आल्याचे त्यांनी सांगितले.

ऋतिक मयेकर, रसिका वारेकर आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, समीर नाकाडे, मारुती ढेपसे, प्रिया बेर्डे यांचे सहकार्य लाभले Four People Drowned in Aare Vare Sea

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. Four People Drowned in Aare Vare Sea

Related Notification Information :  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Official Website Information  Click Here

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !