Pm Kisan | किसान पेन्शन घेतली; वसुलीला आता अडचणी!

किसान पेन्शन घेतली; वसुलीला आता अडचणी! आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन

Pm Kisan | किसान पेन्शन घेतली; वसुलीला आता अडचणी!
Pm Kisan | किसान पेन्शन घेतली; वसुलीला आता अडचणी!


धुळे : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी वर्गाला आर्थिक वर्षात तीन टप्यात एकूण ६ हजार रुपयांचा लाभ दिला जातो. ही योजना लागू झाल्यापासून अनेक शेतकऱ्यांनी सन्मान निधीचा लाभ घेतला. परंतु यात आयकर भरणारे तसेच नोकरदार अधिक वार्षिक उत्पन्न असलेले शेतकरी समाविष्ट आहेत. ही बाब लक्षात येताच शासनाने अशा शेतकऱ्यांना अपात्र ठरविले. आता असे शेतकरी जिल्ह्यात किती याच्या माहितीचे संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्यावतीने दोन हेक्टर शेतीच्या मर्यादेत शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभ दिला जातो. आतापर्यंत शासनाने १४ हप्ते दिलेले आहेत. तर राज्य शासनाकडून पहिला हप्ता मागील वर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. परंतु या योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र शासनाने शेतकऱ्यांची पडताळणी न केल्यामुळे नोकरदार, आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा योजनेचा लाभ देण्यात आल.

पंतप्रधान किसान योजनेचे ६० हजार लाभार्थी

जिल्ह्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे सुमारे ६० हजार लाभार्थी आहेत. या लाभाथ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहेत. या संख्येत नवीन लाभार्थीचीही भर पडत आहे.

शेतकऱ्यांच्या माहितीचे होतेय संकलन 

■ आयकर भरणारे शेतकरी किती, जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लाभ घेतला आहे, आयकर भरत असल्याने किती शेतकरी बाद होतील याच्या माहितीचे संकलन सध्या सुरू झालेले आहे.

लाखोंचा निधी केला जाणार वसूल

■ ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लाभ घेतला आहे आणि ते आयकर भरत असतील अशा शेतकयांची माहिती संकलित झाल्यानंतर जे शेतकरी अपात्र ठरतील त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे.

नवीन शेतकऱ्यांच्या नोंदणीस अडचणी

■ पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी तसेच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभासाठी शेतकरी ऑनलाइन अर्ज सादर करत आहेत. परंतु त्यांची नोंदणी होत नसल्याने त्यांना लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत.

[👇 इतर योजना ची माहिती 👇]

1) आभा कार्ड योजना लिंक

2) 4 लाख अनुदान विहिर योजना लिंक 

3) Maha DBT शेतकरी योजना लिंक 

4) ESI Scheme योजना लिंक  

5) कृषी क्रांती विहीर अनुदान योजना लिंक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !