Gramin Batmya

weather today Live

काय आहे? आदिवासी अधिकार दिवस संपूर्ण माहिती वाचा. : What Is Adivasi Adhikar Divas In Marathi
Tribal Area News

काय आहे? आदिवासी अधिकार दिवस संपूर्ण माहिती वाचा.

What Is Adivasi Adhikar Divas In Marathi : नमस्कार वाचक बंधुंनो : आमच्या graminbatmya.in च्या अधिकृत website ला भेट दिल्या बद्दल आज मी तुम्हाला आदिवासी अधिकार दिवस बद्दल थोडक्यात माहिती चा लेख देणार आहे. तसेच आदिवासी अधिकार दिवस आणि ०९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस कधी घोषित झाला. व आदिवासी अधिकार दिवस कितवा दिवस आहे.? असा संपूर्ण लेख वाचा.

काय आहे? आदिवासी अधिकार दिवस : What Is Adivasi Adhikar Divas In Marathi

आदिवासी अधिकार दिवस १३ सप्टेंबर २०१४ रोजी आदिवासी लोकांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेने एक ठराव मंजूर केला. त्यात जागतिक आदिवासी लोकांच्या संरक्षणासाठी घोषणापत्र तयार केले. जाहीरनाम्यातील आदिवासींचे अस्तित्व, कल्याण आणि विकासाचे सातत्य लक्षात घेऊन आपल्या देशात आदिवासींचे काय हक्क आहेत याबाबतीत बरेचसे अज्ञान असल्याने आदिवासी बहुसंख्य भागातील सर्व संघटना एकत्र येऊन आदिवासी कला, संस्कृती, ज्ञान, नैसर्गिक वारसा, इतिहास, जीवनशैली, जीवनमूल्ये, साधेपणा, सहकार, सहिष्णुता, बंधुता, स्वावलंबन, स्वाभिमान, निसर्ग संवर्धन, प्राणी संरक्षण इत्यादी जगाला खऱ्या अर्थाने सांस्कृतिक मूल्यांची गरज आहे.

आदिवासी अधिकार दिवस आणि ०९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस

जागतिकीकरण आणि निसर्ग यांच्यातील संघर्ष ग्लोबल वॉर्मीग, कृत्रिम विकास यामुळे मानवताच नष्ट होईल. त्यामुळे जागतिक स्तरावरील विचारवंतांनी मानवी संस्कृतीचा नैसर्गिक वारसा म्हणजेच आदिवासी समुदाय आणि त्यांची जीवनशैली जपली पाहिजे. तरच जगात मानवी संस्कृती टिकेल. अन्यथा मानवी संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. असे सांगून संयुक्त राष्ट्र महासभेच्या विचारवंतांनी १३ सप्टेंबर २००७ हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी हक्क आणि अधिकार दिनासोबत ०९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला आहे.

२०२४ मध्ये आदिवासी अधिकार दिवस कितवा दिवस आहे.?

आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिवस यंदा चा अठरावा दिवस आहे. देशातील सर्व आदिवासी बहुल राज्य, जिल्हे, तालुके, गावागावात जागतिक आदिवासी अधिकार दिवस साजरा करून आदिवासींचे सक्षमीकरण करूया. अधिकार आणि हक्कांबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो. ( What Is Adivasi Adhikar Divas In marathi

खालील दिलेल्या माहिती देखील वाचू शकता. 

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !