Yes I am tribal I am talking satpuda Marathi film Production : होय मी एक आदिवासी – “मी सातपुडा बोलतोय” मराठी चित्रपट :
होय! मी एक आदिवासी, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. ज्यांचा बुलंद आवाज आजपर्यंत या दऱ्या-खोऱ्यात गुंजणारा पण आजपर्यंत त्यांच्या व्यथा जाणून घेण्यास मी कुठंतरी कमी पडतांना दिसतंय.
Yes I am tribal I am talking satpuda Marathi film Production :
माझा वाली कोण ? याचा प्रश्न मलाच पडतंय, माझी ओळख सर्वांनी आपापल्या सवळीनुसार( परीने) जसे की-वनवासी, जंगली, लुटारू, नक्षलवादी, दरोडेखोर, वंचित आदिवासी असा अर्थबोध माझ्या (अंगावरील फाटक्या कपड्यांच्या आधारे माझे चरित्र ) दैनंदिन राहणीमानातील परिस्थितीवर आधारित माझी ओळख वरील संबोधलेल्या नावांनी पटवून दिली जाते, तेव्हा कुठंतरी वाटतंय की, खरंच मी असा आहे का?
ती माझी संस्कृती आहे,जी मला माझ्या पूर्वजांनी वरदान केलेली आहे. कारण, *मी एक निसर्ग*/*प्रकृती पूजक आहे.*जल-जंगल-जमिन हे माझं हृदय(काळीज)म्हणून वावरणारा मी एक आदिवासी, एक तीर-एक कमान,लाल सलाम,उल्गुलान यांचा उद्धार करणाऱ्या क्रांतीसूर्य धरती आबा वीर बिरसा मुंडाचा मी भक्त आणि भारताचा एक खरा वारसदार, सातपुड्याच्या कुशीत निसर्गरम्य (दऱ्या-खोऱ्यात) सानिध्यात वसलेली माझी नंदनगरी* मध्ये मला नेहमीच का? म्हणून दुय्यम दर्जा दिला जातंय .
मी,पण तुमच्यातलाच/तुमचाच अविभाज्य घटक आहे हो, आता मला पण मुख्य प्रवाहात यायचं आहे . अहो, तुमच्या बरोबर माझी शिदोरी मला कुठं मिळेल का हो! मला कोण मिळेल का माझा वाली ? नुसतं तुम्ही मला परके केलंय आणि वाऱ्यावर सोडलंय, अहो! मी कोणाचं काय ‘बिघडवलंय’का? माझे आधार,माझी ओळख या उपक्रमाची सुरवात माझ्यापासूनच झाली आणि मला माझ्या ओळखीचा विसर पडलांय असं आपणास वाटत नाही का? मी माझ्या पूर्वजांनी दिलेला वारसा जोपासण्यास मी चुकलं तर नाहीच ना ?
त्यामुळे माझ्यावर आज उदयास आलेल्या खराब परिस्थितीला केवळ – केवळ आपण स्वतः जबाबदार आहोत ! असं आपणास वाटत नाही का? माझा आजचा युवा पिढीला केंद्रबिंदू पासून वंचित का ठेवलं जातंय असं एकंदरीत प्रश्न उद्धभविणे या बाबीचा आपण सखोल विचार केलंय की नाही, सदर घटकाला कारणीभूत कोण? आहे.त्या वर आपली भूमिका काय राहिली पाहिजे, त्या बाबी विचाराधीन आहे की नाही?
मी फक्त एक आदिवासी म्हणून विश्व आदिवासी दिवस ९ ,ऑगस्ट रोजी किंवा इतर सण -उत्सव अथवा , सामाजिक कार्यातील देखावा पुरता जागा होतो असं आपणास एक साधारण प्रश्न आपल्या अंगी येतंय की नाही?
ज्यावेळी माझ्या अस्तित्वाला/अस्मितेला पूर्णपणे ठेच पोहचतो, जेव्हा अस्मिता संपविण्याचे षडयंत्र आखले जाते तेव्हा कुठं जातंय? हा युवा की, *फक्त जल्लोष करण्यासाठीच मला ठेवलंय का*?
मा. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताच्या संविधानात माझ्यासाठी पाचव्या आणि सहाव्या अनुसूचित विशेष तरतूद केलेली असुन स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटली पण आजतागायत माझ्यात फारचा बदल झालेला दिसत नाही
आज संपूर्ण जग आर्टिफिसिअल एन्टलजेनची जमान्यात वावरतांना मी मात्र आहे त्याच ठिकाणी माझ्या मूलभूत दैनंदिन गरजा भागविण्याच्या कोड्यात अडकलेलं आहे, माझे मूलभूत प्रश्नच सुटत नाहीत.
जसे की, *बेरोजगारी,कुपोषण,सामाजिक ,सांस्कृतिक, नैतिक,भौगोलिक आणि आर्थिक असमानता, शैक्षणिक कमतरता,दारिद्रय आणि आरोग्य इत्यादी बाबींच्या विचार केलं जातंय*?
या जन्मात तरी होईल का ?माझी सुटका सदर प्रश्नांच्या कसाट्यातून याची मला सार्थ चिंता वाटते*. *मी माझ्या हक्काचे मागत आहे जे मला संविधानाने दिलेले आहे.
ज्यांनी मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली त्या बापालाच तर? नाही ना मी
माझ्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, TRTI, आदिवासी विकास विभाग, traibal aafairs यांच्या सहाय्याने सर्वोतपरी प्रयत्न करुन सुद्धा माझ्यात अधिकची भर का पडत नाही*? *याची मला खंत वाटते*, *मग मला वाटतं की माझंच चूकतंय*,की काय?
सातपुड्याच्या कुशीत वसलेली ही नंदनगरी,बाल क्रांती वीरांची आहुती देणारी भूमी म्हणुन ओळख पटवून दिली जाते*तसेच मला लाभलेला निसर्गाचा/प्रकृतीचा देणगी(वारसा) म्हणून लाभलेल्या या नंदनगरीला दोन पश्चिम वाहिन्या नद्या आहे. अर्थात,नर्मदा आणि तापी , परंतू आजही मी दुष्काळतच वावरतो, तापी नदीच्या काठावर वसलेले प्रकाशा हे एक तीर्थ क्षेत्र त्यालाच भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. एवढा मोठा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या नंदनगरीची ओळख आहे, मात्र तंतोतंत लागू होतांना दिसत नाही*.
सातपुड्याच्या कुशीत वसलेली माझी नंदनगरी धुळे जिल्हयातून दिनांक १ जुलै १९९८ रोजी विभाजन झाले, नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मा. डॉ. विजयकुमार गावित यांना ओळखले जाते, स्वतंत्र जिल्हा निर्मितीपासून ते आजपर्यंत माझे नेतृत्व करणारे तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मा. डॉ. विजयकुमार गावित, माजी क्रीडा व पालक मंत्री, मा. अॅड.पद्ममाकर जी वळवी ,
माजी आदिवासी विकास मंत्री मा. अॅड.के. सी. पाडवी,मा. संसदरत्न डॉ. हिनाताई गावित, विधानपरिषद सदस्य- आमदार मा. आमशा दादा पाडवी, मा. आमदार – राजेश दादा पाडवी, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा मा. सिमाताई वळवी, आताच्या जिल्हापरिषद अध्यक्षा मा. डॉ. सुप्रिया गावित तसेच नवनिर्वाचित खासदार- मा. गोवाल पाडवी, मा.नागेश दादा पाडवी व आदी मान्यवर यांनी आता पर्यंत तुम्ही सर्वांनी मला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चक्रिय आणि मोलाची कामगिरी (भूमिका) निभाविलेली आहे.
त्यात काडी मात्र *शंका* *नाही (दुमत नाही) ! त्याच बरोबर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणारे व माझ्या युवा पिढीला त्यांची जबाबदारीची जाणीव करुन देणारे व्यक्तिमत्व*, *डॉ. प्रा.कैलास वसावे सर* *हे नेहमीच सक्रिय असतात.
परंतू , एवढं सगळं आटा-पिटा करून देखिल अधिकची पोकळी भरून निघताना दिसून येत नाही असं का? होते बरं! अद्याप इतर जगाच्या तुलनेत आजही माझे मूलभूत प्रश्नच सुटत नाहीत , असं माझं सोबत का? घडतंय बरं.
जसे की, बेरोजगारी,कुपोषण,सामाजिक ,सांस्कृतिक,भौगोलिक आणि आर्थिक असमानता, शैक्षणिक असाक्षरता ,दारिद्रय आणि आरोग्य इत्यादी. या अडचणीतून सुटका होईल का? यांची खेद वाटते. ( Yes I am tribal I am talking satpuda Marathi film Production )
आजची युवा पिढी कुठं तरी शिक्षणासाठी मुख्यत्वे करुन भरकटताना दिसून येतंय, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नाशिक ,पुणे, मुंबई, येथे स्थलांतरीत होऊन शिक्षण क्षेत्रात करिअर करण्यासाठी अथांग धावपळ सुरू आहे. परंतू , त्यांनाही कुठं तरी नाहक त्रास सहन करावं लागतंय, त्या युवकांचा मनात शिक्षण घेण्यासाठी खूप तळमळ आहे*!
परंतू , *त्यांना मिळालेली संगत सोडू असं वाटत नसल्याने त्यांना चांगला मार्ग अपेक्षित असून देखिल ते युवा बेरोजगारीने* *आजचा युवा पिढी ही वेगळ्या मार्गाने (ट्रॅक) धरून वाटचाल करू लागली आहे.त्या बाबींच्या सर्वस्वी विचार होणे नितांत गरज आहे*.
आजचं युवक हा प्राथमिक शाळेत पूजलेल्या अडचणींना सामोरे जात कसं तरी तळ-मळीने आपले शिक्षण पूर्ण करतो, परंतू पुढं काय? अपेक्षित बाबी कडे अधिक कल दिसून येत नाही. म्हणून यश संपादन करण्यात आपण असमर्थ ठरत आहोत.त्यातला किंचित बोटावर मोजण्या इतके स्वतः डोळ्यात तेल ओतून अहोरात्र अभ्यास करून यश संपादन करून मोठ्या जागी स्थान मिळविलेअधिकारी म्हणून कार्यरत असणारे मान्यवर आहेत..त्यांचं कडून युवा पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे, व ते अधिकारी बांधव देखिल नेहमी उद्याच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी नेहमी धावपळ करत असतात*.
अर्थात,मा.अजय खर्डे सर (IRS), मा. डॉ. राजेंद्र भारुड सर (IAS) , तसेच अनेक आपले बांधव त्या स्थानी मजल मारण्यासाठी अहो- रात्र दिवस प्रयत्न करुन देशाची सर्वोच्च परीक्षा UPSC उत्तीर्ण होऊन आज माझ्या सर्वांगीण विकासासाठी मोलाची कामगिरी बजावत आहेत.
त्याच प्रमाणे *क्रीडा क्षेत्रात श्री. किसन तडवी (सातपुडा एक्सप्रेस), श्री.अनिल वसावे(गिर्या रोहक)* *या सर्वांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीला झुंज देत देश पातळीवर त्यांनी नाव लौकिक करण्याचं त्यांनी धाडस केली*.
मा. मेधा पाटकर मॅडम यांनी नर्मदा बचओ आंदोलनाच्या अधिपत्या खाली माझ्या अस्तित्वासाठी दिवसरात्र एक करुन न्याय मिळवून दिला, तसेच मा. प्रतिभाताई शिंदे यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या अधिपत्त्या खाली वन दावे मिळवून दिले.
तसेच, आताच्या घडीला तन – मन – धन हे वाक्य आत्मसात करून पुढं वाटचाल केली पाहिजे, म्हणून नेहमी तरुणांना प्रत्साहित करून पुढं एक पाऊल टाकण्यासाठी प्रयत्न करणारे सातपुड्यातील तमाम पत्रकार युवक बांधव हे नेहमी सत्य परिस्थितीला अनुसरून स्थानिक पातळीवरील मुद्दे पुढं आणत समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात .
तसेच आजच्या परिस्थिती लक्षात घेता अनेक तरुण बांधव सत्य परिस्थिती वर काम करत आहे. अर्थात , डॉ.दिलवरसिंग वसावे, श्री.अजय दादा गावित, डॉ.सतिश पाडवी, प्रा. श्री.साऱ्या दादा पाडवी , श्री.सुशील कुमार पावरा सर, सातपुड्यातील संस्कृती, अस्मिता टिकवून ठेवली पाहिजे म्हणून, गीतकार , कवी, अँड.सुभाष वळवी हे नेहमीच गीतच्या अनुषंगाने मांडणी करण्याचं प्रयत्न करीत असतात.
तसेच पुढं परिवर्तन अपेक्षित आहे, अशी जबाबदारी घेऊन सातपुड्यातील सर्व वकील बांधव देखिल सतत प्रयत्न शील असतात.तसेच, नवीन दगडावर रेघ काढण्यासाठी मार्ग दाखविणारे संपूर्ण शिक्षक बांधव प्रयत्नशील असतात, विशेष:ह उल्लेख करू असं वाटते, ते शिक्षक – श्री.रामजी पाडवी सर व त्यांची टिम सातपुड्यातील शिक्षणाचं दर्जा उंचाविला पाहिजे म्हणून रोज नवीन उपक्रम राबविण्याचा भूमिकेत असतात. संपूर्ण शिक्षक कर्मचारी बांधवांचे सहकार्य नेहमीच लाभते, सर्व व्यापारी बांधव आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते बांधव यांचं नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभते*!
Yes I am tribal I am talking satpuda Marathi film Production : होय मी एक आदिवासी – “मी सातपुडा बोलतंय” मराठी चित्रपट
या *शीर्षक आधारित पहिल्यांदाच *”मी एक आदिवासी”* ह्या *मराठी चित्रपट* वर शुट्टींगला सुरवात केली जाणार आहे, व सदर मराठी चित्रपट काम पूर्ण झाल्यावर लवकरच प्रदर्शित होणार आहे, असं ‘ *चित्रपट दिग्दर्शक* ‘ *मा.श्री.विकी वसावे सर हे त्या चित्रपट करिता सर्वस्वी जबाबदारी हाती घेऊन चित्रपट शूटिंगला सुरवात करणार आहे*
आज माझ्यासाठी स्थानिक पातळीवरील मूलभूत अडचणींना/प्रश्नांना प्रत्यक्ष कृतीवर आधारित समस्या सोडवून आपली मोलाची कामगिरी बजावतांना अनेक समाज बांधव दिसतात*.
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या माझ्या नंदनगरीवर आधारित सदर चित्रपट असेल ! मी एक आदिवासी – “मी सातपुडा बोलतंय” या चित्रपटाचे शुटींग आदिवासी – बोलीभाषा, मराठी आणि हिंदी भाषेत चित्रपटाचे शूटिंग हे संपूर्ण महाराष्ट्रातून संकलित केलं जाईल, सदर चित्रपटाचे आपले पहिले आदिवासी दिग्दर्शक, श्री. विकी वसावे सर आणि चित्रपट निर्माता, मा.प्रा. श्री.साऱ्या दादा पाडवी व त्यांचे सर्व सहकारी बांधव ह्यांच्या मार्फत लवकरच आपल्या सातपुड्यात चित्रपट शूटिंगला सुरुवात होत आहे.
सदर चित्रपट हा सातपुड्यातील आदिवासीवर आधारित असून सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या नंदनगरीकडून सहकार्याची अनंत अपेक्षा आहे*.!!जय जोहार, आप की जय, जय बिरसा!
हेही वाचा :
- उत्तर महाराष्ट्रातील एक आदिवासी पावरा (जात) समाज Adivasi Pawara Samaj
- आदिवासी समाजाचे नाव गौवरवविणाऱ्या चुनीलाल पावराचा जीवनपरिचय वाचा.
- आदिवासी राजनीति / नेता राजकुमार रोत का जीवन परिचय पढे
- आदिवासी क्रांतिकारक जीवा वसावा का जीवन परिचय जाने
- आदिवासी समाजाचा महत्वाचा सण होळी Adivasi Holi 2024
- TRTI पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह कोचिंग योजन
लेखक*, *सातपुड्यातील एक आदिवासी बांधव : Yes I am tribal I am talking satpuda Marathi film
व्ही एस फिल्म प्रोडक्शन निर्मित “मी एक आदिवासी” या मराठी ,चित्रपटासाठी 6 ते 60 वयोगटातील कलाकाराची थर आवश्यकता आहे शूटिंग ऑगस्ट पासून सुरू होत आहे. मुंबई,पुणे, व नंदुरबार परिसर या लोकशन वर होईल.
लीड रोल पुरुष 2
- वय 18 ते 25
- उंची 5.5
लीड रोल स्त्री 2
- वय 18 ते 25
- उंची 5.5
मेन व्हिलन पुरुष 1
- वय 35 ते 50
- उंची 5.7
Bagraound विलन लुक पुरुष 10
- वय 20 ते 30
- ऊंची 5.7
बंसर 5
- वय 22 ते 5
- उंची 5.5
जिम असलेली पाहिजे
- एमेले 2
- वय 45 ते 55
ग्रूप डान्सर मुलो – मुली 7
- वय 18 ते 21
साईड रोल महिला = 4
- वय 18 ते 40
बाल कलाकार मुले,मुली 5
- वय 3 ते 12
कलाकारांना विनंती आहे, आपण सहकार्य करा*. !इच्छुक व्यक्तींनी खालील नंबर दिलेल्यावर त्वरित संपर्क करण्यात करावं*.!
सदर ऑडिशन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या परवानगीने होत असून ऑडिशनसाठी कुठलीही फी आकारली जाणार नाही*.!
ऑडिशन मुंबई – कांदिवली या ठिकाणी होईल ,लोकेशन आणि वेळ* *निवड झाल्यास सांगितले जाईल.
अधिक माहितीसाठी. संपर्क करा.
Casting director Vikcy vasave.
9422892647 या नंबर वर profile send करण्यात यावे.
( Yes I am tribal I am talking satpuda Marathi film Production ) जास्तीत जास्त आदिवासी कलाकारांना प्राधान्य दिला जाईल.
हेही वाचू शकता :
- DhabaDevi Temple Boradi History In Marathi. धाबादेवी एक प्राचीन मंदीर. | धाबादेवी मंदिर इतिहास.
- याहा मोगी, देवमोगरा माता जी का इतिहास जाने हिंदी में | History of Devmogra Mata in Hindi
- नंदूरबार जिल्हातील (Astamba Rushi Yatra) आस्तंबा पर्वतची उल्लेखनिय माहिती.
- नवादेवी धबधबा आणि मंदिर ची रोचक माहिती. | Navadevi Waterfall Temple Information In Marathi
Leave a Reply